Dussehra 2023 : भारताच्या विविध भागांत अन्नपदार्थांची विविधता! दसऱ्याच्या दिवशी हे पदार्थ मानले जातात शुभ

चला तर दसऱ्याला कोणते पदार्थ खाणे शुभ मानले जाते ते जाणून घेऊया.
Dussehra 2023
Dussehra 2023 esakal

Dussehra 2023 : नवरात्रीचे नऊ दिवस उत्साहात साजरे केल्यानंतर येतो दसरा. या दिवशी लोक घरी वेगवेगळे पदार्थ बनवतात. आपल्या भारतात प्रत्येक सणाला नैवेद्याचं विशेष महत्व असतं. भारताच्या प्रत्येक भागात तुम्हाला खाद्यपदार्थांत विविधता बघायला मिळेल. चला तर दसऱ्याला कोणते पदार्थ खाणे शुभ मानले जाते ते जाणून घेऊया.

विळ्याच्या पानांना मान्यता

उत्तर प्रदेशमध्ये पान खाणे शुभ मानले जाते. रावणाचा पुतळा जाळल्यानंतर लोक एकमेकांस मिठाई आणि पान चारत आलिंगण देतात. तर काही लोक बजरंगबलीच्या चरणी पानाच नैवेद्य दाखवल्यानंतर खातात, जेणेकरून आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी आशीर्वाद मिळावा. विळ्याचे पान विजय, प्रतिष्ठा आणि सन्मानाचे प्रतिक आहे. या दिवशी रामाने सितेला परत घरी आणले होते. या आनंदाचा उत्सव लोक साजरा करतात. तर काही लोकांची अशी देखील मान्यता आहे की मेघनाद आणि कुंभकर्ण यांच्यावर विजय मिळवण्याच्या आनंदात विळ्याचे पान खाल्ले जाते.

काय आहे यामागचं विज्ञान

वैज्ञानिकदृष्ट्या बघितल्यास विळ्याच्या पानात अँटीऑक्सिडंट्स असतात जे बदलत्या वातावरणात होणाऱ्या आजारांपासून तुमचा बचाव करतात. काही लोक नवरात्रीच्या नऊ दिवसांत उपवास ठेवतात. तेव्हा पचन नीट व्हावे यासाठी विळ्याची पानं खाल्ली जातात.

रसगुल्ला

दसऱ्याला रसगुल्ला खाणेसुद्धा शुभ मानले जाते. ही बंगाली डिश आहे. दूर्गा पूजा बंगालमध्ये फार उत्साहात केली जाते. इथे रसगुल्ला खाणे शुभ मानले जाते.

दुधात प्रोटीन, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते. एक्सपर्टच्या मते रसगुल्ला खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. तुम्ही डायटिंगवर असाल तर सारखेचा पाक पिळून तुम्ही रसगुल्ला खाऊ शकता.

Dussehra 2023
Dussehra 2023

गोड डोसा

कर्नाटकमध्ये दसऱ्याच्या दिवशी गोड डोसा खाल्ला जातो. यात गहू-तांदळाचे पीठ, गूळ, तूप आणि विलायची पावडर असते. या डोस्याचा नैवेद्य देवापुढे ठेवला जातो.

Dussehra 2023
Dussehra 2023

दही साखर

हिंदू धर्मात दही-साखर खाणे शुभ मानले जाते. कुठलेही शुभ काम करण्याआधी दही-साखर खाऊ घातली जाते. तेव्हा दसऱ्याच्या दिवशी रामाला दही-साखरेचा नैवेद्य दाखवला जातो.

Dussehra 2023
Dussehra 2023

जिलबी-फाफडा

असे मानले जाते की रामाला जिलबी फार आवडते. या पदार्थाशिवाय रामाचा नैवेद्य अपूर्ण असतो. अशी मान्यता आहे की रामाच्या विजयानंतर जिलबी खाऊन आनंद साजरा करण्यात आला होता. गुजरातमध्ये जिलबीसोबत फाफडासुद्धा खाल्ला जातो. हा पदार्थ बेसनापासून तयार केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com