
Festivals in 2025: नवे वर्ष जवळ येताच दिनदर्शिकेवर सण कधी, कोणत्या तारखेला येतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले असते. विशेषतः गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी असे सण कोणत्या महिन्यात येतात, हे आवर्जून पाहिले जाते. 2025 या नव्या वर्षात सर्वच सण सरासरी दहा ते बारा दिवस आधीच येत आहेत. लाडक्या गणरायाचे आगमन एरवी सप्टेंबर महिन्यात होते, तर यंदा ऑगस्ट महिन्यात बाप्पांचे घरोघरी आगमन होणार आहे.