
Surya Grahan Horoscope Prediction: यंदा 30 मार्चला गुढी पाडवा साजरा केला जाणार आहे. गुढी पाडव्याच्या एक दिवस आदी म्हणजेच 29 मार्चला सूर्य ग्रहण लागणार आहे. खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप खास असणार आहे.
चैत्र नवरात्रही सूर्यग्रहणाच्या दुसऱ्याच दिवसापासून सुरू होत आहे, जेव्हा माता दुर्गेचे नऊ दिवसांचे शुभ दिवस सुरू होतील. परंतु या ग्रहणाचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व देखील आहे, कारण ते मीन आणि उत्तरभाद्रपद नक्षत्रात होईल, ज्याचा काही राशींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या राशी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.