Ganpati 2022: 'या' पाच आयडिया वापरून झटपट स्वच्छ करा काळी पडलेली तांब्या पितळची भांडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati 2022

Ganpati 2022: 'या' पाच आयडिया वापरून झटपट स्वच्छ करा काळी पडलेली तांब्या पितळची भांडी

Ganpati 2022: गणोशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. घरोघरी गणपतीसाठी खरेदी करण्यासह घरातल्या साफसफाईही लगबग सुरू झाली असेल. गणपतीत तांब्या पितळाची पुजेची भांडी स्वच्छ घासून पुसून ठेवावी लागतात. महिनोंमहिने तसेच पडून राहिल्यानं ही भांडी काळपट पडलेली असतात. वारंवार घासूनही भांड्याना हवीतशी चमक येत नाही. पुजेत बहुतेक लोक वापरतात ती भांडी पितळ किंवा तांब्याची असतात. पूजेची भांडी जास्त वेळ साफ न केल्यास त्यामध्ये डाग दिसतात. जे अजिबात चांगले दिसत नाहीत आणि सहज साफ होत नाहीत. म्हणूनच या लेखात आपण तांब्या पितळाची भांडी चमकवण्यासाठी काही सोप्या आयडिया सांगणार आहोत.

तुम्ही पितळच्या भांड्याना किंवा देव देवतेच्या मूर्तीना बेकिंग सोडा आणि लिंबानेही स्वच्छ करू शकता. लिंबाच्या रसामध्ये बेकिंग सोडा मिसळा आणि नंतर ही पेस्ट मूर्तींवर कापडाने लावा. काही वेळ असेच राहू द्या. यानंतर कोमट पाण्याने मूर्ती स्वच्छ करा.यासाठी तुम्हाला एक नवीन स्क्रॅच ब्राइट घ्यावा लागेल. त्याला सर्फ लावून पितळाची भांडी स्वच्छ करा.

हेही वाचा: Ganpati 2022: बाप्पाला वाहल्या जाणाऱ्या ‘दुर्वां’चे हे आहे खास आरोग्यदायी महत्त्व

पितळ आणि तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही चिंचेचा वापर करू शकता. यासाठी फक्त चिंच घ्या आणि त्यात थोडे गरम पाणी घाला. काथ्याचा वापर करून या पाण्यानं भांडी घासून घ्या. त्यानंतर साध्या पाण्यानं भांडी स्वच्छ धुवा.
पूजेसाठी वापरण्यात येणारी तांबे आणि पितळेची भांडी तुम्ही पांढऱ्या व्हिनेगरने स्वच्छ करू शकता.

यासाठी थोडे पांढरे व्हिनेगर पाण्यात टाकून उकळा. आता त्यात थोडे सर्फ आणि पाणी घाला. या द्रावणाने भांडी धुतल्याने छान चमकतील. पितांबरी पावडर तुम्हाला बाजारात मिळेल.

तुम्ही स्कॉच ब्राईटमध्ये थोडी पितांबरी टाका आणि त्याने भांडी धुवा. त्यानंतर भांडी पाण्याने धुवावीत. यामुळे पूजेची भांडी चमकदार होतील. लिंबाच्या रसामध्ये एक चमचा मीठ मिसळा आणि हे मिश्रण पितळेची भांडी आणि मूर्तींवर घासून घ्या.

नंतर भांडी कोमट पाण्याने धुवा. या सोप्या पद्धतीने, भांडी आणि मूर्ती नव्याप्रमाणे चमकतील.

Web Title: Ganpati 2022 Clean Blackened Copper Brass Utensils Quickly Using These 5 Ideas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..