esakal | तुम्हाला माहितेय, देवीसमोर का घातला जातो गोंधळ? जाणून घ्या आख्यायिका
sakal

बोलून बातमी शोधा

तुम्हाला माहितेय, देवीसमोर का घातला जातो गोंधळ? जाणून घ्या आख्यायिका

नवरात्र उपासने दरम्यान घरात देवीला प्रिय असलेले संबळ वाजवून आरतीचे महत्त्व वाढल्याने घराघरांत संबळ, तुणतुणे व खंजिरीचे मंगलमय सूर निनादत आहेत.

तुम्हाला माहितेय, देवीसमोर का घातला जातो गोंधळ? जाणून घ्या आख्यायिका

sakal_logo
By
श्रावण तीर्थे

कोरवली (सोलापूर) : देवीचे उपासक मानले गेलेले गोंधळी घरोघरी जाऊन वाद्यांच्या सुरात देवीची गाणे सादर करीत असल्याचे चित्र नवरात्र उत्सवा (Navratri Festival) दरम्यान कामती परिसरामध्ये दिसून येत आहे. नवरात्र उपासने दरम्यान घरात देवीला प्रिय असलेले संबळ वाजवून आरतीचे महत्त्व वाढल्याने घराघरांत संबळ, तुणतुणे व खंजिरीचे मंगलमय सूर निनादत आहेत. कामती परिसरातील गोंधळी घराघरांत जाऊन संबळ, तुणतुणे व दिमडी वाजवून देवीची कवने सादर करीत आहेत.

हेही वाचा: दहन नव्हे, दसऱ्याला केली जाते रावणाची पूजा; कुठे आहेत ही मंदिरं?

कोण घालतात गोंधळ?गोंधळी ही देवीच्या भक्तांची भटकी जमात आहे. गोंधळ हा लग्न, मुंज, बारसे, जावळ अशा समारंभांच्या वेळेस देवी - देवतांच्या उपासनेसाठी केलेला एक कुळाचार असल्याने नवरात्रात गोंधळीचे स्वर घरादारात उमटणे मंगलमय मानले जाते. संबळ, तुणतुणे, टाळ, झांजरी, दिमडी आदींसह हातातल्या दिवटीचा वापर गोंधळी करतात. सुनील महाराज रेणके, भाऊकांत गायकवाड, श्रीकांत गायकवाड व त्यांचे पथक कामती परिसरातील गावांतील घरोघरी जाऊन देवीची कवने सादर करीत आहेत.

जाणून घ्या गोंधळी गीतांची आख्यायिका

याबाबत गोंधळी सुनील महाराज रेणके म्हणाले, की नवरात्रात घरात संबळ व देवीला प्रिय असलेले गोंधळीचे स्वर घुमले पाहिजे. पूर्वीपासून ही प्रथा आहे. देवीची स्तुतिपर कवने रचावी लागतात. ही कवने आम्ही रचतो. शक्‍यतो गोंधळी दुसऱ्याची रचलेली कवने गात नाहीत. शारदीय नवरात्र काळात देवीचा गोंधळ घालण्याची पद्धत आहे. गोंधळी देवीची स्तुती करणारी कवने सादर करतात. भगवान परशुराम यांनी बेटासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याचे शीर धडापासून वेगळे करत शीराच्या तंतूंपासून संबळ तयार केल्याची आख्यायिका आहे. यानंतर माता रेणुकासमोर हे वाद्य वाजवून त्यांनी उपासना केल्याची आख्यायिका आहे. तेव्हापासून गोंधळाची परंपरा सुरू झाली. तुळजाभवानी मातेची कवड्यांची माळ गळ्यात घालणारा गोंधळी असतो, अशी माहिती सुनील महाराज रेणके यांनी सांगितली.

loading image
go to top