
Shenacha Wada | Govardhan Puja
sakal
Govardhan Puja: दिवाळीच्या सणाला आधुनिकतेचा साज चढला असला तरी ग्रामीण भागात आजही काही परंपरा मातीशी नाळ जपून आहेत. वनवार्लासह गावागावांत पाडव्याला बुधवारी (ता. २२) मातीच्या घराच्या अंगणात शेणाचा वाडा तयार करून गोवर्धन पूजा करण्यात आली. ही प्रथा केवळ धार्मिक नाही, तर पर्यावरण, शेती आणि पशुधनाशी असलेले आपले जीवनसंबंध दर्शवणारी आहे.