Gudi Padwa 2024: निसर्ग व सृष्टीचा सृजनकाळ 'गुढीपाडवा'

Gudi Padwa 2024: ''गुढीपाडवा'', निसर्गाचा आणि सृष्टीचा हा सृजनशीलतेचा काळ आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये या दिवसाला सण म्हणून आपण उत्सव म्हणून साजरा करतो.
Gudi Padawa
Gudi PadawaSakal
Updated on

दीपाली मुळे

संस्कृती, परंपरा या प्रवाही असतात. भाषा दर १० कोसांवर बदलते असे मानतात. केवळ भाषाच नाही तर परंपरा बदलतात. परंपरांना तिथली जैवविविधतेशी जोडून संस्कृती तयार होते. हळूहळू संस्कृती उदयास येते आणि काळानुरूप बदल झाले तरी निसर्गाशी जोडण्याचा संस्कृतीचा मूळ स्वभाव मात्र तसाच राहतो.

पण भारतीय अगदी उत्सव प्रिय आहोत. भारतात वर्षभर विविध सण साजरे केले जातात. त्यातलाच हा आपल्या नवीन वर्षाचा पहिला सण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे '' गुढीपाडवा ''. गुढीपाडवा हा हिंदू वर्षाचा पहिला सण. गुढी म्हणजे ''ध्वज'' आणि ''पाडवा'' म्हणजे प्रतिपदा तिथी.

म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जो ध्वज आपण आपल्या घरात अंगणात उभा करतो, त्याला ''गुढीपाडवा'' असे म्हटले जाते. गुढीपाडव्याच्या आधी घराची स्वच्छता केली जाते. आपल्या घराच्या पद्धतीनुसार आपल्या देवघराजवळ किंवा अंगणात किंवा घरावर ही गुढी उभारली जाते.

स्वच्छ काठवर सुंदर वस्त्र नेसून त्यावर तांब्याचा कलश ठेवला जातो. त्या कलशाला चारी दिशांना गंध लावून मध्यभागी स्वस्तिक काढून पाटावर ही गुढी उभारली जाते. त्यावर हार, फुलं, साखरेची गाठी कडुलिंबाचा डगळा लावला जातो.

गुढीच्या बाजूला सुंदर अशी रांगोळी काढून औक्षण, पूजा, नैवेद्य ,आरती केली जाते. दाराला, देवघराला आंब्याच्या पानांचं तोरण लावून सुशोभित करून संपूर्ण कुटुंब पारंपरिक वेशभूषेत असते. सण आणि खाद्यसंस्कृतीचा सुरेख मिलाफ यात बघायला मिळतो.

Gudi Padawa
Family Time: मुलांना द्या 'क्वालिटी टाईम', डायरीमध्ये आनंदी क्षण टिपण्याची लावा सवय...होईल मोठा फायदा

बऱ्याच ठिकाणी गुढीपाडव्याचा खास बेत असतो. पुरणपोळी ,कटाची आमटी, भाजी ,वरण-भात ,भजे ,चटणी, कोशिंबीर अशी थाळी सजते. काही ठिकाणी कैरीची डाळ, कैरीची चटणी, श्रीखंड, पुरी, भाजी असा बेत असतो. हवामानात होणारे बदल सुसह्य व्हावे म्हणून आपली खाद्य संस्कृती अशा पद्धतीने मदत करते.

याच काळात शशिराची पानगळ थांबून झाडांना नवीन पालवी यायला सुरुवात होते. सर्वसृष्टी ही नवोन्मेषशालिनीचे स्वरूप धारण करते. दिवस मोठा आणि रात्र छोटी होते. याच काळामध्ये फळ फळावळांनी बाजारपेठ भरून जाते. टरबूज, खरबूज, आंबे, अंगूर अशा पद्धतीचे वेगवेगळे फळ बाजारामध्ये मिळतात. ''गुढीपाडवा'', निसर्गाचा आणि सृष्टीचा हा सृजनशीलतेचा काळ आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये या दिवसाला सण म्हणून आपण उत्सव म्हणून साजरा करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com