
गुरुमाऊलींचा जयंती महोत्सव आजपासून अकोटात
अकोट : वारकरी सांप्रदायाला नवसंजीवन देणाऱ्या श्रद्धेय श्री संत वासुदेव महाराज यांचा १०५वा जयंती महोत्सवाला शनिवार, ता. २६ फेब्रुवारीला श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे भक्तीमय वातावरणात प्रारंभ होत आहे.
या भक्ती सोहळ्यात ता. २६ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान विविध धार्मिक,आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांची खास पर्वणी ठरणार आहे. ज्ञानेश्वरी सामुहिक पारायण, प्रवचन, श्री ज्ञानेश्वरी भाव कथा निरुपण ,हरिपाठ तथा नामवंत किर्तनकारांचे किर्तनादी कार्यक्रम संपन्न होत आहे. पारायणपीठाचे नेतृत्व .अंबादास महाराज मानकर करणार आहेत.
ज्ञानेश्वरी भावकथा निरुपण
श्री ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक व चिंतक डाॕ गोपाल महाराज झामरे, प्राध्यापक श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय अकोला यांचे दररोज सायं ३ ते ५ दरम्यान श्री ज्ञानेश्वरी भावकथा निरुपण भाविकांना ज्ञानामृताची मेजवाणी ठरणार आहे.
कीर्तन महोत्सव जयंती महोत्सवात दररोज रात्री ८ वा. आयोजित कीर्तनमालेत ता.२६ ला भागवत महाराज साळुंके आळंदी, ता.२७ ला संजय महाराज ठाकरे कौडण्यपूर, ता.२८ ला गणेश महाराज शेटे वरुर जऊळका, ता.१ मार्चला ज्ञानेश प्रसाद पाटील अकोट, ता.२ ला रविंद्र महाराज हरणे मुक्ताईनगर, ता.३ ला भरत महाराज पाटील जळगाव खांदेश ता.४ ला देवेंद्र महाराज निढाळकर यांचे कीर्तन नियोजित आहेत.
ऑनलाइन सोहळ्याचे प्रसारण
या सोहळ्याचे निमित्ताने श्रद्धासागर येथे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. भव्य संतपीठ उभारण्यात आले असून, रांगोळ्या वारकरी पताका, विद्युत रोषणाई व स्वागत कमानीने हे श्रद्धास्थळ फुलून गेले आहे. जयंती महोत्सवातील सर्व कार्यक्रम संस्थेच्या युट्युब चॕनेलवरील संत वासुदेव महाराज टी व्ही थेट प्रक्षेपण करण्यात येत असून भाविकांना लाभ घेता येईल. या भक्ती सोहळ्याची पुर्णाहूती ता. ५ मार्चला ‘श्रीं’च्या जन्मोत्सवाने होईल असे संस्थेद्वारा सांगण्यात आले आहे.
Web Title: Gurumaulis Jayanti Festival Begins Today Akota
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..