Hartalika 2022: लग्न ठरण्यात येता आहेत अडथळे?हरतालिका व्रताच्या दिवशी करा 'हे' उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hartalika 2022: लग्न ठरण्यात येता आहेत अडथळे?हरतालिका व्रताच्या दिवशी करा 'हे' उपाय

Hartalika 2022: लग्न ठरण्यात येता आहेत अडथळे?हरतालिका व्रताच्या दिवशी करा 'हे' उपाय

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचा उपवास केला जातो. यंदा 30 ऑगस्ट 2022, मंगळवारी हरतालिका आहे. हरितालिकेच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रीचा उद्देश असतो, की देवी पार्वती आणि भगवान शिव यांना तिच्या व्रत आणि उपासनेने प्रसन्न करणे हा असतो.

जेणेकरून त्याच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात. काही जण आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना करतात, तर काही जणी मनासारखा वर मिळावा या इच्छेने निर्जळ व्रत ठेवतात. हा उपवास विवाहित महिला आणि अविवाहित मुली दोन्ही करतात. हे व्रत केल्यामुळे पतीला दीर्घायुष्य मिळते तर इच्छित पती देखील प्राप्त होतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते. दरम्यान ज्यांच्या वैवाहिक जीवनात वारंवार अडथळे येत आहेत किंवा त्यांचे कोणाशी तरी संबंध तोडले आहेत, त्यांनी या दिवशी काही खास उपाय करावेत. त्यामुळे त्यांना लवकरच चांगला आणि मनासारखा जोडीदार मिळेल.

हेही वाचा: Hartalika Puja: हरतालिकेच्या पुजेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, काय आहेत नियम जाणून घ्या

चला तर मग बघू या हरतालिका व्रताच्या दिवशी नेमके कोणते उपाय करावे?

● हरितालिकाच्या दिवशी निर्जळ व्रत ठेवावे. भगवान शिव आणि देवी पार्वतीची विधीपूर्वक पूजा करा. या वेळी शिवाला बेलची पाने, धोत्रा, आक फुले आणि पांढरे वस्त्र अर्पण करावे.

● दुसरीकडे, देवी पार्वतीला लाल व्रस्त्र आणि श्रृगांर अर्पण करा. असं केल्यानं विवाह लवकर होतो आणि चांगला जोडीदार मिळतो हरतालिकच्या दिवशी पूजा केल्यानंतर देवी पार्वतीची आरती करा - 'जय-जय गिरिराज किशोरी...'. धर्मग्रंथानुसार माता सीतेने आपल्या स्वयंवरापूर्वी ही आरती केली होती आणि तिच्या प्रभावामुळे त्यांना भगवान श्री रामसारखा योग्य वर मिळाला.

● शक्य असल्यास देवी पार्वतीची रोज पूजा करून ही आरती करावी. यामुळे लवकरच एखाद्या चांगल्या व्यक्तीसोबत लग्न होईल.

● हरतालिकेच्या दिवशी एखाद्या विवाहित महिलेला श्रृंगारचे सामान नक्कीच अर्पण करा हरतालिकेच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीला केशरमिश्रित गाईच्या दुधाचा अभिषेक करा. या दरम्यान, ओम नमः मनोभिलाषितं वरं देही वरं हरी ओम गोरा पार्वती देवाय नमः या मंत्राचा जप करत रहा. लवकरच सर्व अडथळे दूर होतील आणि सनई वाजतील

Web Title: Hartalika 2022 Obstacles In Marriage Do These Remedies On Haritalika Vrat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..