

Hartalika 2026
esakal
Hartalika 2026: हिंदू धर्मात हरतालिका तृतीया हा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी महिला माता पार्वती आणि भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात. यंदा १४ सप्टेंबर २०२६ रोजी हरतालिका तृतीया साजरी केली जाणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाची हरतालिका काही राशींसाठी खास ठरू शकते. महादेव आणि माता पार्वतीच्या कृपेमुळे काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळू शकते, तर काही दिवसांपासून रखडलेली कामंही मार्गी लागू शकतात. मेष, सिंह आणि वृश्चिक या तीन राशींसाठी हा काळ विशेष शुभ असल्याचं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं.