Hindu Marriage Rituals : लग्नापूर्वी नवरा नवरीला हळद का लावली जाते? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hindu Marriage Rituals

Hindu Marriage Rituals : लग्नापूर्वी नवरा नवरीला हळद का लावली जाते?

Hindu Marriage Rituals : लग्नाचं सीजन सुरू आहे. लग्नसमारंभात सर्वात महत्त्वाचा आणि शुभ दिवस हा हळद समारंभाचा असतो. हिंदू धर्मात या हळदीच्या परंपरेला खूप महत्त्व आहे. या हळदीच्या समारंभात नवरदेव आणि नवरीला (bride and groom) लग्नाच्या आधी हळद लावली जाते पण तुम्हाला माहिती आहे का लग्नाआधी वधू आणि वराला का हळद लावली जाते?

आज आपण या मागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण घेऊया. (Hindu Marriage Rituals bride and groom why haldi ceremony procedure before wedding or marriage )

हळद लावण्यामागे धार्मिक कारण
सनातन धर्मात भगवान श्री हरि विष्णुला कर्ता-धर्ता मानले जाते. भगवान विष्णु जगाचे पालनहारी आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरवात करण्यापूर्वी भगवान विष्णुची पूजन केली जाते. भगवान विष्णुच्या पूजेत हळदीला विशेष महत्त्व आहे.

धार्मिक मान्यतेनुसार हळदीला सौभाग्याचं प्रतीकही मानलं जातं. यामुळे लग्नापूर्वी नवरा-नवरीला हळद लावली जाते.

हळद लावण्यामागे धार्मिक महत्व
ज्योतिषशास्त्रामध्ये देवगुरू बृहस्पतिचा विवाह आणि वैवाहिक नात्याचं कारक ग्रह मानले जाते. हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी असतो. अशात लग्नाच्या आधी नवरा नवरीला हळद लावल्याने गुरुची कृपा दांपत्याच्या जीवनावर होते.

यामुळे लग्नापूर्वी नवरा-नवरीला हळद लावली जाते. सोबतच त्यांना नजर लागू नये आणि ते नकारात्मक ऊर्जेपासून दूर रहावे, यासाठीही ही हळद खूप फायदेशीर असते.

हळद लावण्यामागे वैज्ञानिक महत्त्व
हळद ही खूप गुणकारी असते. यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी सेप्टिक गुण असतात जी स्किन आणि शरीराला स्वच्छ, सुंदर ठेवण्यास मदत करते. हळद लावल्याने चेहऱ्यावर तेज येते आणि कोणत्याही प्रकारे त्वचेला इंफेक्शन होत नाही.