Hindu Rituals : हवन करताना स्वाहा का म्हणतात? जाणून घ्या यामागची कहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hindu Rituals

Hindu Rituals : हवन करताना स्वाहा का म्हणतात? जाणून घ्या यामागची कहाणी

Why do you say Swaha while doing Havan : हिंदू धर्मामध्ये अगदी वेद काळापासून होम हवन करण्याला विशेष महत्व दिलं जातं. अगदी अलिकडच्या काळातही पाऊस पडावा, गृहशांती किंवा अगदी पौर्णिमेचेही हवन केले जाताना बघायला मिळतात. हवन करताना हवन कुंडात अग्नी पेटवून त्यात आहुती देण्याला महत्व असतं. ही आहुती देताना स्वाहा असं प्रत्येक मंत्रानंतर म्हटलं जातं. असं का, जाणून घ्या

का देतात आहुती?

शास्त्रात असं म्हटलं आहे की, हवनातल्या अग्नीत दिलेल्या हवनाने देवी-देवता यांना प्रसन्न करून घेता येतं. ही आहुती म्हणजे त्यांचं अन्न असतं. ज्यामुळे देवतांना शक्ती मिळते असे मानले जाते. त्यामुळे वांछित फळ प्राप्ती होते.

स्वाहा का म्हणतात?

स्वाहा करणं याचा सरळ अर्थ अर्पण करणे असा घेतला जातो. पण या स्वाहा शब्दाविषयी एक काहाणीपण जोडली गेलेली आहे.

काय आहे कथा

हवन करताना अग्नीमध्ये आहुती दिली जाते. यावेळी प्रत्येक मंत्राच्या शेवटी स्वाहा म्हटलं जातं. असं म्हणतात की, स्वाहा ही राजा दक्षची मुलगी होती. तिचं लग्न अग्नी देवाशी झालं. त्यामुळे कोणतेही हवन यशस्वी होण्यासाठी अग्नीत दिल्या जाणाऱ्या आहुतीला अग्नीदेव आणि पत्नी स्वाहा यांना एकत्रीत दिली जाते. त्यामुळे जर स्वाहा म्हणत आहुती दिली तर अग्नी देव ते स्वीकार करतो असं म्हणतात.

अजून एक कहाणी सांगितली जाते

कथेनुसार एकदा देवताना अन्नाची कमतरता भासू लागली. या कठीण परिस्थितीतून वाचण्यासाठी ब्रह्मदेवाने उपाय सुचवला. ब्राह्मणांद्वारे देवतांना भोजन पोहचवण्याचं ठरलं. यासाठी अग्नीदेवाची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी अग्नीत भस्म करण्याची शक्ती नव्हती. यासाठी स्वाहाचा जन्म झाला. स्वाहाला अग्नीदेवीसोबत राहण्याची आज्ञा देण्यात आली. अग्नी देवाला दिला जाणाऱ्या नैवेद्याचं स्वाहा सेवन करते आणि देवताना पोहचवते. तेव्हापासून स्वाहा अग्नीदेवासोबत आहे.

टॅग्स :Hindu religion