
Hindu Rituals : महिलांनी अंत्यसंस्कारासाठी स्मशानात का जाऊ नये? शास्त्र सांगते ही ४ कारणे
Why Hindu Women Don't Go To Cremation Ground : हिंदू परंपरेनुसार कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाल्यावर त्यांना स्मशानभूमीवर अग्नीदाह देऊन अंत्यसंस्कार करण्यात येतो. पण इथे महिलांनी स्मशानभूमीवर जाऊ नये असे म्हटले जाते. यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का? घरातल्या कोणत्याही पुरुषाचा किंवा स्त्रीचा मृत्यू झाला तरी घरातल्या महिला त्यांना अंगणापर्यंतच पोहचवतात. स्माशानभूमीवर फक्त पुरुषच जातात. यामागचं शास्त्रात काय कारण सांगितलं आहे जाणून घेऊया.
हिंदू संस्कृतीत मुल जन्माला आल्यापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत वेगवेगळे एकूण १६ संस्कार सांगण्यात आले आहेत. त्यातला शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. हिंदू धर्माच्या मान्यतांनुसार स्मशान घाटावर नकारात्मक उर्जा निर्माण होते. ती महिलांवर लवकर हावी होऊ शकते. यामुळे महिलांना अज्ञात आजार होऊ शकतात.
महिला अतिशय भावूक असतात. कोणाच्या मृत्यूने त्यांना जास्त क्लेष होतात. अशात स्मशान भूमीत मृतव्यक्तीला अग्नीदाह देताना बघून त्यांना अधिक त्रास होऊ शकतो. त्यांच्या आक्रोषाचा त्रास मृत व्यक्तीच्या आत्म्याला होतो आणि त्याला गती मिळायला त्रास होतो.
जेव्हा प्रेत जाळलं जातं तेव्हा अनेक विषारी किटाणू वातावरणात मिसळतात. म्हणून पुरुष टक्कल करून, नदीत आंघोळ करून शुद्ध होतात. पण हिंदू धर्मात स्त्रियांनी केस कापण्यास अशुभ मानले आहे.
स्माशानभूमीवर अतृप्त आत्म्याचा वास मानला जातो. महिला कोमल हृदयाच्या असल्याने त्यांच्यावर हे आत्मे लवकर हावी होऊ शकतात, म्हणून महिलांनी स्मशानभूमीवर जाणे वर्ज्य आहे.
सध्या या रुढीत झालेला बदल
काळानुसार आपण बघू शकतो की, महिला हल्ली स्मशानभूमीवर जाऊ लागल्या आहेत. आणि मुली देखील अग्नीडाग देऊ लागल्या आहेत.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.