Hindu Rituals : प्रसाद नेहमी उजव्या हातात का घ्यावा l Hindu Rituals Why Prasad Should Take In Right Hand | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hindu Rituals

Hindu Rituals : प्रसाद नेहमी उजव्या हातात का घ्यावा?

Why Prasad Should Take In Right Hand : हिंदू धर्मिय घरात कोणतंही धार्मिक कार्य असेल, मग अगदी एखादी, पूजा, आरती झाली की, प्रसाद उजव्या हातात घ्यावा अशी सूचना घरातल्या लहानग्यांना हमखास ऐकायला मिळते. कारण लहान मुलं सहज शक्य होईल तो हात पुढे करतात, पण प्रसाद कायम उजव्याच हातात घ्यावा अशी मान्यता आहे आणि याला विशेष महत्वही दिलं जातं. पण असं का, यामागचं कारण काय हे बहुतेकांना माहित नसतं.

मंदिर असू द्या किंवा घर हिंदू धर्म संस्कृतीनुसार देवाची पूजा किंवा आरती झाल्यावर प्रसाद वाटला जातो. हा प्रसाद म्हणजे इश्वाराची कृपाच मानली जाते. प्रसाद घेण्याची एक विशिष्ट पद्धत असते. प्रसाद नेहमी उजव्या हातानेच घेतला जातो. उजव्या हाताखाली डावा हात धरला जातो.

डाव्या हाताने प्रसाद घेणं अशुभ मानलं जातं. पण बऱ्याच लोकांना ही अंधश्रद्धा वाटते. आपल्या शास्त्रांचं ज्ञान नसल्याने असं होतं.

कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात उजव्या हाताने केल्याने सकारात्मक परिणाम होतात अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. त्यामुळे धार्मिक कार्य करताना, यज्ञ, दान आदी करताना उजव्या हातानेच करतात. हवन करताना आणि यज्ञ नारायण भगवंताला आहुती देताना उजव्या हाताचाच वापर केला जातो. उजवा हात सकारात्मक उर्जा देणारा असतो.

हिंदू परंपरेनुसार प्रसाद म्हणजे भगवंताचा आशीर्वाद होय. त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी ही प्रथा रुढ केली आहे. शिवाय डाव्या हाताचा वापर शारीरिक शुचितेसाठी करण्यात येत असल्याने प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठीही डाव्या हाताचा वापर न करणे चांगले समजले जाते.

टॅग्स :Hindu religion