
Horoscope Predictions Of 29 March: यंदा 29 मार्चला सूर्यग्रहण लागणार आहे. तर दुसऱ्या दिवशी गुढी पाडवा सण साजरा केला जाणार आहे. पण 29 मार्च म्हणजेच शनिवारी 6 ग्रह मीन राशीत एकत्रितपणे स्थित असणार आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी इतर ग्रहांशी संयोग पावतात आणि विविध शुभ आणि अशुभ योग तयार होतात. ग्रहांच्या युतीचा जगावर परिणाम होतो. मीन राशीत 6 ग्रह एकत्र येऊन एक दुर्मिळ योगायोग निर्माण करणार आहेत. सुमारे अडीच वर्षांनंतर, शनि कुंभ राशीतून मीन राशीत येत आहे, जिथे तो पुढील अडीच वर्षे या राशीत राहणार आहे.
शनि मीन राशीत संक्रमण करण्यापूर्वी राहू आणि शुक्र आधीच मीन राशीत संक्रमण करत असतात. सूर्य आणि बुध आधीच मीन राशीत भ्रमण करत आहेत. या दिवशी चंद्र मीन राशीतही प्रवेश करेल. या दिवशी कोणत्या राशीत मोठे बदल होणार हे जाणून घेऊया.