पंढरीचा विठोबा कर्नाटकातील हंपीला कसा गेला? संत भानुदासांनी मूर्ती परत कशी आणली? जाणून घ्या कानडा विठ्ठल!

Hampi To Pandharpur: पांडुरंगाचा आणि कर्नाटकचा नेमका संबंध, विठ्ठलाला 'कानडा राजा' का म्हणतात, वाचा हंपीच्या विजय विठ्ठल मंदिराची गोष्ट....
Why Is Lord Vitthal Called 'Kanada'?

Why Is Lord Vitthal Called 'Kanada'?

esakal 

Updated on

Why 'Kanada Raja Pandharicha'?: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचा इतिहास आणि वारकरी संप्रदायाची परंपरा अत्यंत प्राचीन आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की आज आपण ज्या विठ्ठलाचे दर्शन पंढरपुरात घेतो, तो विठ्ठल एका काळात कर्नाटकातील हंपी (विजयनगर) येथे गेला होता? संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे पणजोबा वैष्णववीर संत भानुदास महाराज (कालखंड: इ.स. १४४५ ते १५१३) यांनी आपल्या अथांग भक्तीच्या जोरावर विठ्ठलाला पुन्हा पंढरीत आणले. या ऐतिहासिक आणि चमत्कारिक घटनेसोबतच, पैठणनगरीत विठ्ठल स्वतःहून कसे आले आणि त्यांना ‘विजयी पांडुरंग’ नाव कसे पडले, याची ही रंजक कथा...

परकीय आक्रमणाचा काळ आणि संत भानुदासांचा उदय

ज्ञानेश्वरांच्या काळानंतर महाराष्ट्रावर भयानक परकीय आक्रमणे झाली, ज्यामुळे अनेक देवळे-मठ उद्ध्वस्त झाले. अशा कठीण काळात लोकांमध्ये स्वधर्माचरणाची निष्ठा टिकवून ठेवण्याचे मोठे कार्य संत भानुदास महाराजांनी केले. इ.स. १४४८ मध्ये जन्मलेल्या भानुदास महाराजांनी बालपणीच सूर्यनारायणाची उपासना करून आशीर्वाद मिळवले होते. प्रपंच चालवण्यासाठी त्यांनी कपड्याचा व्यापार सुरू केला, पण व्यापाराच्या व्यापात असूनही त्यांनी पंढरीची वारी कधीही चुकवली नाही. त्यांनी इ.स. १४६८ ते १४७५ दरम्यानचा भयानक 'दुर्गादेवीचा दुष्काळ' देखील अनुभवला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com