Holi 2023 : घरचे नसले तरी मित्र आहेत की.. अशी साजरी करा आपली बॅचलर्स होळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi Puja Rituals

Holi 2023 : घरचे नसले तरी मित्र आहेत की.. अशी साजरी करा आपली बॅचलर्स होळी

Holi Puja Rituals for Bachelors : आजकाल खूप तरुण आपल्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी मोठ्या शहरात राहायला येतात, अशात घरच्या होळीची आठवण येते ना? आणि होळीची पूजाही करावीशी वाटत असेल ना? पण इथे कुठे? हरकत नाही.. घरचे नसले तरी मित्र आहेतच की? अशी करा होळीची पूजा.

अशी करा घरातली पूजा :

१. सर्वात आधी आपल्या घरातला पसारा आवरुन घ्या.

२. आता घर स्वच्छ झाडून घ्या, शक्य असेल तर घर पुसून घ्या.

३. बाजारात फुलांची अनेक तोरणं मिळतात तुम्ही दाराला एखादं तोरण लावू शकतात.

अशी करा होलिकाची पूजा :

१.आजूबाजूला अनेक ठिकाणी होलिका दहन होतात त्यापैकी एक जागा शोधून संध्याकाळी छान तयार व्हा.

२. आपल्या सगळ्या ग्रुपसोबत होलिका मातेच्या दर्शनाला जा.

३. शक्य असेल तर एका ग्लासमध्ये दूध आणि दुसऱ्यात पाणी घेऊन जा.

४. होलिका मातेची पूजा करा.

५. सगळ्या ग्रुप सोबत छान सेल्फी काढा.

टॅग्स :Holi