आजूबाजूच्या प्रत्येक घडामोडीवर आपले नियंत्रण कधीच नसते. पण 'आपले नियंत्रण असलेच पाहीजे' असा अट्टाहास केला की त्याचा आपल्यावरच नकारात्मक परिणाम होऊ लागतो. आपल्या आवाक्याबाहेरच्या किंवा नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी सोडून कशा द्याव्या, हेच आपल्यापैकी अनेकांना उमगत नाही. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये याबद्दल मार्गदर्शन केले आहे.