
Solar Eclipse 2025 And Saturn Transit Effect On Zodiac Signs: वेदिक पंचांगानुसार, २९ मार्च २०२५ रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण दुपारी २.२० वाजता सुरु होऊन संध्याकाळी ६.१६ वाजता संपेल. याच दिवशी शनि ग्रह साडेसात वर्षांनंतर मीन राशीत प्रवेश करणार आहे. तसेच पुढील अडीच वर्ष शनि याच राशीत राहणार आहे. सूर्यग्रहण आणि शनिच्या या राशी बदलाचा दुर्मिळ संयोग काही राशींसाठी लाभदायक तर काहींसाठी आव्हानात्मक ठरू शकतो.