

YOUR PARTNER NUMBER ONE PRIORITY RELATIONSHIP MISTAKES PERSONAL SPACE POSITIVITY SELF RESPECT
esakal
आपल्या जोडीदाराने आपल्यावर जीवापाड प्रेम करावं आणि आपल्याला नेहमी त्याच्या आयुष्यात पहिलं स्थान द्यावं, असं प्रत्येक प्रियकर-प्रेयसीला किंवा पती-पत्नीला वाटणं अगदी स्वाभाविक आहे. नातं म्हटलं की तिथे अपेक्षा आल्याच पण कधीकधी याच अपेक्षांच्या ओझ्याखाली नात्याची वीण सैल होऊ लागते.
प्रेम हे जबरदस्तीने किंवा हक्काने मागून मिळत नाही, तर ते आपल्या वागण्यातून कमावायचं असतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पार्टनरच्या जगात तुमची जागा नेहमी 'नंबर वन' असावी, तर तुम्हाला त्यांच्या मनात आदराचं आणि प्रेमाचं हक्काचं स्थान निर्माण करावं लागेल.
अनेकदा आपण नकळतपणे अशा काही चुका करतो, ज्यामुळे जोडीदार आपल्यापासून दूर जाऊ लागतो. चला तर मग जाणून घेऊया अशा ३ चुकांबद्दल ज्या टाळून तुम्ही तुमच्या नात्यातली गोडी आणि तुमची प्रायोरिटी कायम टिकवून ठेवू शकता.