Shravan 2022 : का करावे शिवलिलामृत पारायण; जाणून घ्या महत्त्व, पारायणाची पद्धत

शिवलिलामृत पारायण केल्याने काय फळ मिळते, हे पारायण कसे करावे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
 Shree Shivlilamrut
Shree ShivlilamrutEsakal

शिवलीलामृत पोथी पारायण

भगवान शंकराचा महिना सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक- भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण, वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पुर्ण करण्यासाठी आराधना करत असतात. याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, आपली दुःख, रोग, चिंता हटावी यासाठी पुराणांमध्ये श्रावणमहिन्याच्या पर्वकाळात शिवलिलामृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे. हे पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्वकाळात हे पारायण कसे करावे हे आपण आता जाणून घेणार आहोत. (Importance of Shivlilamrut Parayan in Shravan and proper method of Parayana)

 Shree Shivlilamrut
Nag Panchami 2022 : जाणून घ्या पुजा कशी करावी, सापाची भीती वाटणाऱ्यांनी हा मंत्र म्हणावा

श्रावण महिन्यात शिवलिलामृत पोथीचे पारायण का करावे.?

शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे याचा वेद अन् पुराणांत उल्लेख सापडतो. मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख, संकटे असतातच. याच दुःख, संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावे. आपले जिवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि याचसाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलिलामृत पोथीचे पारायण करावे असे संत- महात्मे सांगतात. शिवलिलामृत पोथीच्या १५ अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याल जिवनातील प्रत्येक प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात. प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि याचसोबत हे पारायण कशाप्रकारे करावे हेही आपण पुढे जाणून घेणार आहोत.

 Shree Shivlilamrut
महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नसलेले एकमेव मंदिर

शिवलिलामृताच्या प्रत्येक अध्यात मिळेल जिवनाचा सार...

भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे. शिवलिलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरुंचे आशिर्वाद प्राप्त होतात. दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते. तिसरा अध्यायातून आपल्या पापांचे क्षालन होवून जिवनाला सद्मार्गाची दिशा मिळते.

चौथा अध्यायाने शिवपुजनाचे यथोचित फळ प्राप्त होवून आपल्यावर येणारी आपत्ती टळेल. पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल. सहाव्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल. त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल. सातव्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकराची कृपा होवून मृत्यूवर मात करता येईल. आठव्या अध्यायातून संकटे, शारीरिक व्याधिंतून सुटका मिळेल. नवव्या अध्यायातून पुर्व जन्माची स्मृती होवून या जन्माचा उद्धार होईल.

 Shree Shivlilamrut
Shravan Somvar 2022 : पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहण्यामागचा भक्तिभाव जाणून घ्या

दहावा अध्याय पुर्ण झाल्यानंतर उमामहेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जिवनाला एक नवी दिशा मिळेल. अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल. हित शत्रूंचे बळ कमी होईल, प्रतिष्ठा- मानसन्मान वाढेल. बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गतील प्राप्त होईल. परिवारावरील भूत, पिश्चाची बाधा नष्ट होईल. तेरव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल, अडकलेली कामे मार्गी लागतील. चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल, याच सोबत विद्येची प्राप्ती होईल. शिवलिलामृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे. या अध्यायाच्या पठणाने पाथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफळ संपुर्ण होईल.

या पद्धतीने करावे शिवलिलामृत सप्ताह पारायण

कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर ११ बेलाची पाने पिंडीवर वाहावी व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन ''मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद (जी इष्ट कामना असेल ती बोलून) प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे ७ दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान् श्रीशंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे." अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे.

शिवलिलामृत पोथी पारायणाचे वार

सोमवार - अध्याय 1 आणि 2

मंगळवार - अध्याय 3 आणि 4

बुधवार - अध्याय 5 आणि 6

गुरुवार - अध्याय 7 आणि 8

शुक्रवार - अध्याय 9 आणि 10

शनिवार - अध्याय 11 आणि 12

रविवार - अध्याय 13, 14 15

 Shree Shivlilamrut
लग्नानंतर पहिल्या श्रावणात केले जाते मधु श्रावणी व्रत

पारायण करताना दीवा तेवत ठेवावा. पारायण संपल्या नंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ति तांदूळ व दक्षिणा ठेवावी. शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरेशुभ्र वस्त्र दान द्यावे. गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी. पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल. इतरांनीही ऐकावी. ग्रंथवाचन पूर्ण झाल्यावर १०८ वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. (शक्य झाल्यास रोज जप करावा.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com