

350 Year Old Taal Tradition
esakal
वारकरी संप्रदायामध्ये भजन आणि कीर्तनाला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व टाळ, मृदंग आणि विणेला आहे. टाळाच्या आवाजाशिवाय वारी पूर्ण होऊ शकत नाही. टाळाला प्रत्यक्ष विठ्ठल स्वरूप मानलं गेलंय, पण तुम्हाला माहितीये का, महाराष्ट्रात एक असे गाव आहे ज्याला 'टाळगाव' म्हटले जाते आणि तिथे दगडी टाळाची पूजा केली जाते! पुणे जिल्ह्यातील चिखली येथील हे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव 'टाळ मंदिर' म्हणून प्रसिद्ध आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने देहू आणि आळंदीला जाणारे भाविक या पवित्र मंदिराला आवर्जून भेट देतात.