Shravan 2022: देवाच्या पूजेत फुल का महत्त्वाची असतात,जाणून घ्या कोणत्या देवाला कोणते फुल आवडते...

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार देवाच्या पूजेमध्ये फुलांचे विशेष महत्त्व आहे. पुजाअर्चा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
god flowers
god flowersesakal

Shravan 2022: शास्त्रानुसार असे म्हटले जाते की फुल हे भगवंताच्या चरणी अर्पण केल्याने पुण्य वाढते, पापांचा नाश होतो आणि भरपूर चांगले फळ मिळते.

देवाचा साज शृंगार करताना नेहमी देवाच्या डोक्यावर फुलांची सजावट करावी आणि पूजा करताना देवाच्या चरणी फुलं अर्पण करावे, असे शास्त्रात सांगितले आहे.

चला जाणून घेऊया की फुले अर्पण केल्याने कोणती फळे मिळतात, फुले अर्पण करणांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि कोणते फूल कोणत्या देवतांना अर्पण करावे.या सगळ्या गोष्टीची सविस्तर माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत.

असे सांगितले जाते की, देवाला फुले अर्पण केल्याने ही उत्तम फळ मिळते. देवाला सोने, चांदी, हिरे, दागिने अर्पण केल्याने ते जितके प्रसन्न होतात तितके फुल अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात असे मानले जाते. फुलांचा हार अर्पण केल्याने फुलांच्या तुलनेत दुप्पट फळ मिळते.

देवाला फुल अर्पण केल्याने काय फायदा होतो ?

तुम्ही गरिबी दूर होते आणि धनलक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहते. महिलांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते. मंगळांची सकारात्मक कृपादृष्टी कुटुंबावर राहते. संपत्ती वाढते. फुलांच्या सुगंधाप्रमाणे तुमच्या घरातील माणसाची कीर्ती सर्वत्र पसरते. मन प्रसन्न राहते. माणसाची सहनशक्ती आणि ताकद वाढते.तुमची वंशावळी वाढते. तुमचा शत्रू आपोआप शांत होतो. तुम्हाला उत्तम आरोग्य प्राप्त होते.

आता पाहू या कोणत्या देवाला कोणती फुले अर्पण करावीत..

1) गणपती पूजेसाठी कोणती फुले चालतात ?

गणपतीला तुळश सोडून बाकी सगळी फुले प्रिय आहेत. विशेष म्हणजे गणपतीला दुर्वा आणि शमीपत्र अतिशय प्रिय आहेत. दुर्वाच्या अर्पण करतांना त्या फक्त तीन किंवा पाच पाने असाव्या.

2) भगवान शंकराच्या पुजेसाठी चालणारी फुले

भगवान शंकराला फुले अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. बेलपत्र आणि धतुरा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहेत. भगवान शंकराची आवडती फुले म्हणजे अगस्त्य, गुलाब, पाटला, मौलसिरी, शंखपुष्पी, नागचंपा, नागकेसर, जयंती, बेला, जपकुसुम, बंधुक, कणेर, निरगुंडी, हरसिंगार, आक, मदार, द्रोणपुष्पा, नीलकमल, कमळ, शमीची फुले इ. भगवान शंकराला जे काही फूल अर्पण करता येऊ शकतात. जस दुर्वा अर्पण केल्याने जीवनप्राप्ती होते आणि धतुरा अर्पण केल्याने पुत्रप्राप्ती होते असे सांगितले जाते. एक गोष्ट निट लक्षात ठेवा, कुंद आणि केतकीची फुले भगवान शंकराला अर्पण केली जात नाहीत.

भगवान शिवाला कमळ खूप प्रिय आहे, यासंबंधीची कथा पुराणात आढळते. देवांचे दुःख दूर करण्यासाठी भगवान विष्णू दररोज शिव सहस्रनामाच्या पठणाने शिवाला एक हजार कमळ अर्पण करत असत. एके दिवशी भगवान शिवाने त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी कमळ लपवले. एक कमळ कमी पडल्यावर भगवान विष्णूंनी आपले एक कमळ म्हणून डोळे भगवान शिवाच्या चरणी अर्पण केले. हे पाहून भगवान विष्णू खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी राक्षसांच्या नाशासाठी त्यांना सुदर्शन चक्र दिले.अशी गोष्ट सांगितली जाते.

3) भगवान श्रीकृष्णाच्या पूजेसाठी कोणती फुले चालतात ?

महाभारतात भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला आपल्या आवडत्या फुलांबद्दल सांगितले होते तेव्हा ते म्हणाले, की मला कुमुद, कणेर, मल्लिका, जाति, चंपा, तगर, पलाशची पाने आणि फुले, दुर्वा, भृंगार आणि वनमाला ही सगळी फुल खूप प्रिय आहेत.

आणि कमळाचे फूल हे लक्ष्मीचे निवासस्थान असल्याने इतर फुलांपेक्षा हजार पटीने अधिक प्रिय आहे आणि तुळशी तर ही कमळापेक्षा हजार पटीने अधिक प्रिय आहे.

god flowers
भगवान जगन्नाथांची रथयात्रा का काढली जाते?जाणून घ्या महत्वपूर्ण कारण

4) भगवान विष्णूच्या पूजेला चालणारी फुले

राम तुळशी आणि श्यामा तुळशी या दोन्ही तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहेत. एका बाजूला ताज्या मालती, चंपा, कणेर, बेला, कमळ आणि रत्नांच्या माळा असतील आणि दुसरीकडे शिळी तुळशी असेल तर विष्णू देव फक्त शिळी तुळशीच ग्रहण करतो. तुळशीची मंजुळा अशी एक वनस्पती आहे, ती भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे. मंजुळेच्या हार परमेश्वराला इतकी प्रिय आहे की तो सुकल्यावरही देव त्याला आनंदाने स्वीकारतात.

भगवान विष्णूला कमळाचे फूल, पारिजातसारखी पांढरी आणि लाल फुले आणि अधूळ, धुपिया, लाल कणेर आणि बरे अशी काही लाल फुले खूप प्रिय आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा आक, धतुरा भगवान विष्णूला अर्पण केला जात नाही.

5) देवीच्या पूजेला चालणारी फुले कोणती ?

गुलाब, कुसुम, लाल कणेर आणि सुवासिक पांढरी फुले अशी सर्व लाल फुले देवीला प्रिय आहेत. कमळाचे फूल देवीला अत्यंत प्रिय आहे. देवीला शिळे फुले व दुर्वा अर्पण केल्या जात नाहीत. सर्व फुलांमध्ये लक्ष्मीचा वास आहे पण त्यांना कमळ खूप आवडते. लाल गुलाब आणि सुंगधी देणारे फुले वाहिली की देवी लवकर प्रसन्न होते

god flowers
कालीमाता मांस, मद्य ग्रहण करणारी देवी - महुआ मोईत्रा

फुले अर्पण करताना या गोष्टी निट लक्षात ठेवा..

तुळशीची पाने, बेलची पाने आणि अगस्त्याची फुले कधीच शिळी होत नाहीत.

कमळ 11 दिवस आणि कुमुद 5 दिवस शिळी होत नाही.

चंपा ची कळी सोडून इतर कोणत्याही फुलाची कळी देवाला अर्पण करू नये.

कोणतेही पान,फुल,फळ देवाला अर्पण करू नये.

ते जसे जन्माला येतात तसे अर्पण करावेत, परंतु बेलपत्र हे भगवान शंकराला उलटे करूनच अर्पण केले जाते.

दुपारनंतर फुले तोडण्यास मनाई आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com