Mythology जेव्हा श्रीकृष्णाने पत्नीला शिकवला धडा, गर्विष्ठ भानुमतीपेक्षा रुक्मिणी ठरली श्रेष्ठ

भगवान श्रीकृष्णाने Lord Krishna केवळ शत्रूंसाठीच नव्हे तर अनेकदा आपल्या सख्या सोयऱ्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देण्यासाठी विविध युक्त्यांचा वापर केला आहे
Mythology श्रीकृष्ण लिला
Mythology श्रीकृष्ण लिलाEsakal

आपल्या सर्वांचे लाडके भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या लीला सगळ्यांनाच ठाऊक आहे. अगदी लहान असल्यापासूनच खोडकर बाळगोपाळाने आपल्या बुद्धीने आणि खोडकरपणाने अनेकांना अद्दल घडवल्याच्या कथा आपण अनेकदा ऐकल्या असतील. Indian Mythology How Lord Shri Krishna taught lesson to Satyabhama

बालगोपाळ श्रीकृष्णाने आपल्या हुशारीने वेळोवेळी शत्रूंचा परभव केला. यासाठी अनेकदा त्याने शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. भगवान श्रीकृष्णाने Lord Krishna केवळ शत्रूंसाठीच नव्हे तर अनेकदा आपल्या सख्या सोयऱ्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देण्यासाठी विविध युक्त्यांचा वापर केला आहे.

आपल्या बुद्धीमत्तेनेच श्रीकृष्णाने तर आपल्या पत्नीचा देखील गर्व दूर केला. श्रीकृष्णाला एकूण आठ पत्नी होत्या. यातील पहिली आणि त्याची लाडकी पत्नी म्हणजे रुक्मिणी तर दुसरी पत्नी सत्यभामा.

भानुमती ही दिसायला अत्यंत देखणी होती. श्रीकृष्णाच्या आठही पत्नींमध्ये ती सर्वात सुंदर म्हणून ओळखली जाई. भानुमती ही उज्जैनचे राजा सत्राजित यांची कन्या होती. सत्यभामाकडे भरपूर संपत्ती, अलंकार होते. मात्र मोठ्या घराण्यातील असल्याचा आणि सुंदर असल्याचा सत्यभामाला गर्व होता. सत्यभामेचा हाच गर्व एकदा श्रीकृष्णाने दूर केला.

हे देखिल वाचा-

Mythology श्रीकृष्ण लिला
Lord Krishna: श्रीकृष्णाचे 'हे' गुण प्रत्येकाने आत्मसात करावेच!

रुक्मिणी ठरली श्रेष्ठ

सत्यभामेला आपल्या संपत्तीचा मोठा गर्व होता. तसंच आपणचं श्रीकृष्णासाठी खास असल्याची भावना तिच्या मनात असायची. श्रीकृष्णाच्या एका जन्मदिनी आपलं पतीवर म्हणजेच श्रीकृष्णावर सर्वात जास्त प्रेम आहे हे दाखवण्यासाठी सत्यभामेने कृष्णाची तुला करण्याचं ठरवलं. यासाठी संपूर्ण तयारी देखील झाली. श्रीकृष्णाचं वजनाचा अंदाज घेऊन सत्यभामाने सोनं तयार ठेवलं.

सत्यभामाच्या या निर्णयाने अनेकजण आनंदात होते. मात्र श्रीकृष्णाला याचा काहीही फरक पडला नाही. श्रीकृष्ण थेट एका पारड्यात जाऊन बसले. सत्यभामाने लगबगीने सर्व सोनं दुसऱ्या पारड्यात ठेवलं. मात्र यानंतरही पारडं काही हलेना. त्यानंतर सत्यभामेने दासांना सांगून आणखी सोनं मागवून दुसऱ्या पारड्यात ठेवलं तरी श्रीकृष्णाचं पारडं जैसे थेच होतं.

श्रीकृष्णाची तुला पाहण्यासाठी संपूर्ण नगरीतील लोक जमा झाले होते. पारडं हलत नसल्याने सत्यभामाला शरमल्यासारखं वाटू लागलं होतं. तीने तिचे सर्व अलंकार मागवून पारड्यात टाकले तरी श्रीकृष्णाचं पारडं जागच्या जागीच होतं. यावर सत्यभामेला रडू कोसळलं.

रुक्मिणीने जिंकलं श्रीहरीचं मनं

सत्यभामा कायमच रुक्मिणीचा मत्सर करायची. मात्र अशा परिस्थितीमध्ये काहीही न सुचल्याने तिने रुक्मिणीकडे धाव घेतली आणि मदत मागितली. यावर रुक्मिणी तुळशी वृदांवनाकडे गेली तिने तुळशीला नमस्कार केला. तुळशीची तीन पानं तोडली आणि दुसऱ्या पारड्यात टाकली. पानं ठेवतात दुसरं पारडं श्रीकृष्णाच्या बरोबरीला आणि आणि तुला संपन्न झाली.

अशा प्रकारे श्रीकृष्णाने आपल्या युक्तीने सत्यभामेला तिची चूक दाखवून दिली. यावर सत्यभामेचा गर्व दूर झाला आणि रुक्मिणी पुन्हा एकदा सर्वश्रेष्ठ ठरली.

हे देखिल वाचा-

Mythology श्रीकृष्ण लिला
Kunti And Shri Krishna Relation : भगवान श्री कृष्ण आणि माता कुंती यांच नातं काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com