Janmashtami 2022: कृष्ण जन्माचा नेमका मुहूर्त कोणता ?बालकृष्णाचा पाळणा आणि आरती

आज म्हणजे 18 ऑगस्टला महाराष्ट्रासह देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा होणार आहे.
Krishna Janmashtami
Krishna JanmashtamiEsakal
Updated on

आज म्हणजे 18 ऑगस्टला महाराष्ट्रासह देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा होणार आहे. हिंदू धर्मीयांमध्ये श्रीकृष्ण जन्म पवित्र उत्सव मानला जातो. तिथीनुसार कृष्णाचा जन्म हा श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला मध्यरात्री झाला होता, त्यानुसार अनेक ठिकाणी रात्री 12 वाजता जन्माष्टमीचा उत्सव सुरु होतो.

कृष्ण जन्माचा मुहूर्त काय आहे? बालकृष्ण जन्माच्या वेळी कोणता पाळणा म्हणावा असे प्रश्न तुम्हाला पडले असतील चला तर मग जाणून घेऊ या प्रश्नाची उत्तरे..

कृष्ण जन्माचा नेमका मुहूर्त कोणता आहे?

18 ऑगस्टच्या रात्री 9.21 ते 19 ऑगस्टच्या रात्री 10.58 पर्यंत राहील अष्टमीची तिथी राहील. 18 ऑगस्टच्या रात्री 11.59 ते 12.44 मिनिटांपर्यंत असेल कृष्ण जन्माचा उत्सव साजरा केला जाईल. यात पूजेचा कालावधी फक्त 45 मिनिटांचा असेल.

Krishna Janmashtami
Janmashtami: या जन्माष्टमीला राशीनुसार करा 'या' मंत्रांचा जप, सर्व मनोकामना पुर्ण होतील

बालकृष्ण जन्माचा सोपा पाळणा..

बाळा जो जो रे कुळभूषणा । श्रीनंदनंदना ।निद्रा करि बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥धृ॥

जन्मुनि मथुरेत यदुकुळी । आलासी वनमाळी ।पाळणा लांबविला गोकुळी । धन्य केले गौळी ॥

बंदिशाळेत अवतरुनी । द्वारे मोकलुनी ।जनकशृंखला तोडुनी । यमुना दुभंगोनी ॥

मार्गी नेतांना श्रीकृष्णा । मेघनिवारणा ।शेष धावला तत्क्षणा । उंचावूणी फणा ॥

रत्‍नजडित पालख । झळके आमोलिक ।वरती पहुडले कुलतिलक । वैकुंठनायक ॥

हालवी यशोदा सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ।पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जति जयजयकारी ॥

विश्‍वव्यापका यदुराया । निद्रा करी बा सखया ।तुजवरि कुरवंडी करुनिया । सांडिन मी निज काया ॥

गर्ग येऊनी सत्वर । सांगे जन्मांतर ।कृष्ण परब्रह्म साचार । आठवा अवतार ॥

विश्‍वव्यापी हा बालक । दृष्ट दैत्यांतक ।प्रेमळ भक्तांचा पालक । श्रीलक्ष्मीनायक ॥

विष पाजाया पूतना । येता घेईल प्राणा ।शकटासुरासी उताणा । पाडिल लाथे जाणा ॥

उखळाला बांधता मातेने । रांगता श्रीकृष्ण ।यमलार्जुनांचे उद्धरण । दावानव प्राशन ॥

गोधन राखिता अवलिळा । कालिया मर्दीला ।दावानल वन्ही प्राशील । दैत्यध्वंस करी ॥

इंद्र कोपता धांवून । उपटील गोवर्धन ।गाईगोपाळा रक्षून । करीन भोजन ॥

कालींदीतीरी जगदीश । व्रजवनितांशी रास ।खेळुनि मारील कंसास । मुष्टिक चाणुरास ॥

ऎशी चरित्रे अपार । दावील भूमीवर ।पांडव रक्षील सत्वर । ब्रह्मानंदी स्थिर ॥

Krishna Janmashtami
Janmashtami 2022 : ताजमहाल नंतर, मथुरेचे हे मंदिर आहे प्रेमाचे प्रतीक

श्रीकृष्णाची आरती

जय जय कृष्णनाथा ।तिन्ही लोकींच्या ताता । आरती ओवाळीता। हरली घोर भवचिंता ।।धृ.।।

धन्य ते गोकुळ हो, जेथे करी कृष्ण लीला । धन्य ती देवकीमाता, कृष्ण नवमास वाहिला ।

धन्य तो वसुदेव, कृष्ण गुप्तपणे रक्षिला । धन्य ती यमुनाई, कृष्णपदी ठेवी माथा ।।

धन्य ती नंदयशोदा, ज्यांनी प्रभु खेळविला । धन्य ते बाळगोपाळ, कृष्ण देई दहीकाला ।

धन्य ते गोपगोपी, भोगिति सुखसोहळा । धन्य त्या राधा-रुक्मिणी, कृष्णप्रेमसरिता ।।

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com