Janmashtami 2023 : कठीण मंत्र उच्चारताना समस्या येताय? हे साधे सोपे मंत्र म्हणून श्रीकृष्णाला करा प्रसन्न

जन्माष्टमीच्या दिवशी लोक त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उपवास करतात आणि श्रीकृष्णाच्या शक्तिशाली मंत्रांचा जपही करतात
Janmashtami 2023
Janmashtami 2023esakal

Janmashtami 2023 : जन्माष्टमी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी श्रीकृष्णाची विधीवत पूजा केली जाते. मंदिरातच नव्हे तर घराघरांत या दिवशी श्रीकृष्ण जन्माचा सोहळा साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी लोक त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उपवास करतात आणि श्रीकृष्णांच्या शक्तिशाली मंत्रांचा जपही करतात. चला तर या दिवशी कोणत्या मंत्रांचा जप करावा ते जाणून घेऊया.

श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा

हा मंत्र श्रीकृष्णाचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी मंत्र मानला जातो. या मंत्राचा जप केल्याने श्रीकृष्णांची कृपा तुमच्यावर कायम राहते. या मंत्राचा जप केल्याने भगवान श्रीकृष्ण कायम तुमची रक्षा करेल.

श्री कृष्णाय नम:

या मंत्राचा जप केल्याने धन-धान्य प्राप्ती होते.

गोवल्लभाय स्वाहा

या मंत्राचा जप जन्माष्टमीच्या दिवशी केल्याने तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील. (Sanskruti)

Janmashtami 2023
Janmashtami Special : जन्माष्टमीला सेवन करूया आरोग्यदायी धनिया पंजिरी, प्रसादाचे आरोग्यदायी फायदे एकदा वाचाच

हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे

भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत विलीन व्हायचे असेल तर या मंत्रांचा जप आवर्जून करा.

ऊँ क्लीं कृष्णाय नम:

हा एक सामान्य मंत्र आहे, या मंत्राचा जप अनेक भक्त दिवसरात्र करतात. श्रीकृष्णाचा आशीर्वाद या मंत्रातून प्राप्त होतो.

ऊँ नमो भगवते वासुदेवाय

या मंत्राचा अर्थ आहे, मी स्वत:ला भगवान वासुदेवास समर्पित करतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com