Janmashtami 2023 जन्माष्टमी स्पेशल सुंठवडा प्रसाद, जाणून घ्या प्रसादाची सोपी रेसिपी

घरच्या घरी कशी तयार करावी सुंठवड्याची रेसिपी, जाणून घ्या
Janmashtami 2023
Janmashtami 2023 Sakal

Janmashtami 2023 जन्माष्टमीचा उत्सव आपल्या देशात जल्लोषात साजरा केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यात हा उत्सव साजरा करण्याची परंपरा देखील वेगवेगळी असते. इतकंच नव्हे तर भगवान श्रीकृष्णला दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्यही वेगवेगळ्या पद्धतीने तयार केला जातो.

महाराष्ट्रात या शुभ दिनी खास सुंठवड्याचा प्रसाद तयार केला जातो. घरच्या घरी कसा तयार करावा हा प्रसाद, जाणून घेऊया रेसिपी… 

Janmashtami 2023
Janmashtami 2023 : राधा-कृष्णाच्या प्रेमाची अतूट खूण विठ्ठलाच्या आरतीतही आहे, कसं ते पहा

सामग्री : 

  • खारीक : सात-आठ

  • काजू : 10-12

  • बदाम : 10-12

  • खसखस : एक चमचा 

  • ओवा : एक चमचा

Janmashtami 2023
Janmashtami 2023 : पंढरपुरात आहे गोवर्धन पर्वत अन् वेणू वाजवणाऱ्या श्रीकृष्णांची मूर्ती, पहा खास फोटो
  • बडिशेप : एक चमचा 

  • तीळ : एक चमचा

  • साखर : दोन चमचे 

  • खडीसाखर : दोन चमचे 

  • सूंठ : दोन चमचे

  • वेलची : दोन ते तीन 

  • मणुके : एक चमचा 

  • किसलेले सुके खोबरे : अर्धा कप  

कसा तयार करावा प्रसाद?

  • गॅसवर एक पॅन गरम करत ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर खारीकाचे काप, काजू आणि बदाम भाजून घ्या आणि एका प्लॅटमध्ये काढा.

  • यानंतर ओवा, बडिशेप, खसखस आणि तीळ एकत्रित भाजून घ्या व यानंतर प्लॅटमध्ये काढून घ्यावेत.

  • यानंतर मनुका, सुके खोबरेही गॅसच्या मंद आचेवर भाजून घ्यावे.    

Janmashtami 2023
Janmashtami 2023: जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या लहान मुलांना मनमोहक श्रीकृष्ण बनवण्यासाठी या खास टिप्स फॉलो करा
  • सर्व सामग्री भाजून झाल्यानंतर गॅस बंद करावा.

  • आता मिक्सरमध्ये साखर, सूंठ आणि खडीसाखर वाटून घ्यावी. 

  • वाटलेली पूड एका बाऊलमध्ये काढावी. आता यामध्ये भाजलेली सर्व सामग्री मिक्स करावी व एकजीव करून घ्यावी.  

  • तयार आहे सुंठवड्याचा प्रसाद. यावर तुळशीपत्र ठेवा आणि भगवान श्री कृष्णाला नैवेद्य दाखवावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com