
Spiritual significance of peacock feathers in Krishna worship: दरवर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वांच्या लाडक्या श्रीकृष्णाचा जन्मदिवस असतो. हीच श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे भक्ती, आनंद आणि रंगतदार उत्सवाचा संगम! या दिवशी घराघरात भगवान कृष्णाची पूजा आणि भजनांचा गजर होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, कृष्णाच्या मुकुटातील मोरपंख फक्त शोभेसाठी नसून शुभतेचे, सकारात्मकतेचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते? वास्तुशास्त्र आणि अध्यात्मात मोरपंखाला विशेष महत्त्व आहे. योग्य ठिकाणी ठेवला, तर तो घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सुख, शांतता आणि प्रगतीचे दरवाजे उघडतो. चला, जाणून घेऊया जन्माष्टमीला मोरपंख ठेवण्याचे विशेष फायदे आणि सोपे उपाय.