Jyotish Upay: नोकरी आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी, हे सोपे उपाय करून बघा. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

astrology news

Jyotish Upay: नोकरी आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी, हे सोपे उपाय करून बघा

Vastu Tips For Promotion In Job And Business: जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी रात्रदिवस प्रचंड मेहनत करत असाल. पण इतकी मेहनत करून सुध्दा तुम्हाला अपेक्षित नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसायात चांगला नफा मिळत नसेल, तर याचा अर्थ तुमच्या घरात कुठेतरी काहीतरी वास्तुदोष आहे, ज्यामुळे तुम्हाला अशा प्रकारची आर्थिक चणचण भासत असु शकते.

प्रचंड मेहनत करूनही तुम्हाला तुमच्या योग्यतेनुसार नोकरी मिळत नसेल, तर शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी लाल कपड्यात पाच लहान वेलची बांधून उशीखाली ठेवावी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून या बांधलेल्या वेलची बुुचडी एखाद्या अज्ञात ठिकाणी फेकून द्यावी.

हेही वाचा: Astrology: का करत नाहीत घरी पिंपळाच्या झाडाची लागवड? जाणून घ्या जोतिष टिप्स

तुम्ही जर का उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार असाल आणि खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहात पण पदरी सतत निराशाच पडत असेल तर शनिवार आणि मंगळवारी सुंदरकांडचा पाठ करावा. हा पाठ नियमित केल्याने तुमचा जॉब सर्च आपोपाप पूर्ण होईल आणि तुम्हाला नोकरीच्या चांगल्या ऑफर मिळू लागतील.

हेही वाचा: Astrology: 'या' चार राशींच्या लोकांना मिळते सहज मनाप्रमाणे नोकरी

व्यवसाय तोटा आपोआप नाहीसा होईल.

जर तुमच्या व्यवसायात सलग तोटा येत असतील आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर काळ्या कुत्र्याला नियमित पोळी खाऊ घालावी तसेच गरजू लोकांना भाजी पोळी द्यावी. असे केल्याने तुमच्या व्यवसायातील सर्व समस्या दूर होतील आणि तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारू लागेल.

हेही वाचा: Sleeping Tips: कोणत्या अवस्थेत झोपणे असते चांगले;वाचा काय म्हणतात एक्सपर्ट्स?

तुम्ही प्रचंड मेहनत करून सुध्दा तुम्हाला तुमच्या व्यवसायात पुन्हा पुन्हा तोटा होत असेल तर दररोज तुमच्या दुकानाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला गव्हाचे पीठ लावावे. हा उपाय  सलग 30-35 दिवस नियमित करावा. असे केल्याने तुमच्या व्यवसायात तोटा आपोआप नाहीसा होऊन तुम्हाला नफा होणे सुरू होईल, ज्यामुळे तुमच्या व्यवसायात वाढ होईल.

हेही वाचा: Astro Tips: कोणत्या दिवशी हाताची नखे कापणे ठरू शकत तुमच्या करता शुभ...

समजा जर का काही गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या व्यवसाय मंदी सुरू असेल आणि ग्राहकसुध्दा दुकानात येत नसतील तर शनिवारी एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याकडून (ठोक व्यापारी) लोखंडाचा तुकडा घेऊन या. यानंतर त्याचे तुमच्या दुकानातील पूजेच्या ठिकाणी ठेवायला एक स्वस्तिक चिन्ह तयार करून घ्यावे,नंतर काळी उडदाची डाळ टाकून त्यावर स्वस्तिक चिन्ह ठेवावे असे केल्याने लवकरच ग्राहक वाढू लागतील आणि तुमचा व्यवसाय वाढू लागेल.

Web Title: Jyotish Upay Try These Simple Solutions To Progress In Job And Business

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :jobBusiness