

Kartik Purnima Kartikswamy Darshan & Traditions
esakal
Kartik Purnima: कार्तिक पौर्णिमेनिमित्त देशभरात विविध धार्मिक विधी आणि पूजा केल्या जातात पण , या तिथीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे कार्तिकस्वामींचे दर्शन. महाराष्ट्रातील पुण्यात असलेले पर्वती मंदिर आणि गुजरातमधील पाटण येथील मंदिर या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
देशाच्या वेगवेगळ्या भागांत कार्तिकस्वामींच्या उपासनेच्या पद्धती आणि परंपरा भिन्न आहेत. कुठे वर्षातून एकदाच मंदिर खुले होते, तर कुठे दररोज पूजा केली जाते.