६ महिन्यांसाठी केदारनाथचे दरवाजे बंद; आता कुठे होणार बाबांचे दर्शन? २०२७ मध्ये कधी उघडणार मंदिर? जाणून घ्या सविस्तर...

Kedarnath Dham Doors Close for Winter 2026: कडाक्याची थंडी अन् हजारो भक्तांची हजेरी! समुद्रसपाटीपासून १,३११ मीटर उंचीवर स्थित ओंकारेश्वर मंदिर; वाचा बाबांच्या शीतकालीन प्रवासाबद्दल...
Kedarnath Dham Closes for Winter 2026; Reopening Likely in May 2027

Kedarnath Dham Closes for Winter 2026; Reopening Likely in May 2027

esakal 

Updated on: 

Kedarnath 2027 Reopening Dates: उत्तराखंडमधील जगप्रसिद्ध अकरावे ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ धामचे कपाट आज ११ नोव्हेंबर २०२६ ला भाऊबीजेच्या पावन पर्वावर पुढील सहा महिन्यांच्या शीतकालीन कालावधीसाठी अधिकृतपणे बंद करण्यात आले आहे. सकाळी ठीक ८:३० वाजता पारंपरिक वैदिक मंत्रोचार, विशेष पूजा-अर्चा आणि स्थानिक वाद्यवृंदाच्या गजरात मंदिराचे मुख्य द्वार बंद करण्यात आले.

कडाक्याची थंडी असूनही या ऐतिहासिक आणि भावुक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो शिवभक्तांनी केदारनाथ धाममध्ये उपस्थिती लावली होती.

Loading content, please wait...