
best place for aquarium: वास्तुशास्त्रानुसार घरात फिश पेंटिंग किंवा अॅक्वेरियम ठेवणे खूप शुभ मानलं जातं. अनेक लोक ते आपल्या घरी आणतात. घरात अॅक्वेरियम असल्याने कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी राहते असे मानले जाते. तसेच, घराचे वातावरण नेहमीच आनंदी राहते. परंतु आपण अनेकदा आपल्या इच्छेनुसार घरात कोणत्याही ठिकाणी अॅक्वेरियम ठेवतो.
वास्तुनुसार असे करणे योग्य नाही. जर तुम्ही अॅक्वेरियम चुकीच्या दिशेने किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवले तर ते शुभ परिणाम देत नाही आणि फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. अशावेळी घरात अॅक्वेरियम कुठे ठेवणे शुभ आहे आणि कुठे ठेवणे अशुभ आहे हे जाणून घेऊया.