

Kitchen Vastu Tips: 4 Things Never to Keep on Your Kitchen Slab
esakal
Vastu Tips for Kitchen: स्वयंपाकघर ही फक्त अन्न शिजवण्याची जागा नसते, तर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचा मुख्य केंद्रबिंदू असते. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराला थेट 'अग्निदेव' आणि 'अन्नपूर्णा मातेचे' पवित्र स्थान मानले गेले आहे. स्वयंपाकघरात तयार होणारे अन्न घरातील प्रत्येकाच्या विचारांवर आणि आरोग्यावर थेट प्रभाव टाकते. पण, बऱ्याचदा जागेची कमतरता किंवा सोयीचा विचार करून किचनच्या ओट्यावर (Kitchen Slab) अशा काही वस्तू ठेवल्या जातात, ज्या नकळत घराची सुख-शांती हिरावून घेतात.
अनेक घरांमध्ये दिवसरात्र मेहनत करूनही पैसा टिकत नाही किंवा घरात सतत आजारपण सुरू असते. याचे मुख्य कारण स्वयंपाकघरातील वास्तुदोष असू शकतो. वास्तुनियमांनुसार किचन ओट्यावर कधीही न ठेवण्यासारख्या ४ प्रमुख गोष्टी आणि त्यांचे जीवनावरील दुष्परिणाम खालीलप्रमाणे आहेत-