

Avoid keeping broken utensils, medicines, mirror, garbage and sharp objects in kitchen as per Vastu Shastra
esakal
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे घराचे उर्जेचे केंद्र मानले जाते, कारण येथे अन्नाच्या माध्यमातून कुटुंबाचे आरोग्य आणि सौभाग्य घडते. जर किचनमध्ये चुकीच्या वस्तू ठेवल्या तर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबतो आणि घरात दरिद्रता तसेच आर्थिक चणचण भासू लागते. किचनमध्ये कधीही तुटलेली किंवा तडा गेलेली भांडी ठेवू नका अशा भांड्यांमध्ये जेवण बनवणे किंवा वाढणे हे घरातील लक्ष्मीला नाराज करणारे ठरते आणि यामुळे मानहानी व धनहानी होण्याची शक्यता वाढते.