

Krishna Janmashtami 2026 Vrat Rules Do's and Don'ts
sakal
गोकुळाष्टमी हा हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला गोकुळाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी अनेक भक्त श्रीकृष्णाच्या भक्तीत उपवास करतात. शरीर आणि मन शुद्ध ठेवण्यासोबतच भक्ती आणि श्रद्धा वाढवणे हा उपवासामागचा मुख्य उद्देश असतो.
गोकुळाष्टमीच्या उपवासाचे नियम प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार आणि व्यक्तीच्या श्रद्धेनुसार वेगळे असू शकतात. मात्र, उपवास करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.