Ladikar Ram Mandir : पावित्र्याची अनुभुती देणारे लाडीकर राम मंदिर; लाडीकर कुटुंब सांभाळते कारभार

लाडीकर राम मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावरच शांततेची आणि पावित्र्याची अनुभुती येते.
Ladikar Ram Mandir
Ladikar Ram Mandirsakal
Updated on

नागपूर - लाडीकर राम मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावरच शांततेची आणि पावित्र्याची अनुभुती येते. रामचंद्र गोपाळराव लाडीकर यांनी १९६५ साली या मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून लाडीकर कुटुंबीयच मंदिराचा कारभार सांभाळत आहेत.

रामचंद्र लाडीकर रामभक्त होते. मुळचे पवनारचे लाडीकर व्यवसायानिमित्त नागपुरला आले. मानेवाडा भागात त्यांनी शेत खरेदी केले. या ठिकाणी राम मंदिर उभारावे, अशी त्यांना प्रेरणा मिळाली आणि जयपूरहून राम-लक्ष्मण-सीतेच्या रेखीव मूर्ती आणण्यात आल्या.

अर्धा एकर परिसरात सुरेख मंदिर बांधण्यात आले. याच परिसरात राहणाऱ्या आध्यात्मिक वृत्तीच्या राजणकर यांच्या हस्ते या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिराला अनेक सामाजिक-राजकीय नेते भेट देत असतात.

सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग

विविध सामाजिक उपक्रमांमध्ये मंदिराचा आर्थिक सहभाग राहतो. या सहभागातून मानेवाडा येथील नाला बुजविण्यात आला. बस स्टॉप बांधण्यात आला. विजेचे खांब लावण्यात आले. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. अनेक गोरगरिबांना लग्नकार्यासाठी मंदिराची जागा उपलब्ध करून देण्यात येते.

शुद्ध आचरणाला महत्त्व

मंदिराचे पावित्र्य कायम राखण्यासाठी मंदिर व्यवस्थापन काया-वाचा-मने शुद्ध आचरणाला महत्त्व देते. सरकार किंवा इतर कोणत्याही दान दात्यांकडून मंदिरासाठी देणगी स्वीकारली जात नाही. संपूर्ण परिसरात आग्रहाने शुचिता राखली जाते. सध्या लाडीकरांची तिसरी पिढी मंदिर सेवेत आहे. त्यांनीही ही शुचितेची परंपरा कायम राखली आहे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन

लाडीकर राम मंदिरात वर्षभर विविध उत्सव साजरे होतात. राम नवरात्रानिमित्त रामायणाचे पारायण सुरू आहे. दररोज पूजा-अर्चा, आरती केली जाते. तुलसी रामायणातून रामजन्माचा अध्याय वाचला जातो. रामजन्माच्यावेळी पुष्पवृष्टी, भजन-कीर्तन, आरती व प्रसाद वितरण केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com