Lakshmi Pujan: माता लक्ष्मीची पूजा करताना करा 'या' चार मंत्रांचा जप, होणार धनसंपत्तीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lakshmi Pujan

Lakshmi Pujan: माता लक्ष्मीची पूजा करताना करा 'या' चार मंत्रांचा जप, होणार धनसंपत्तीत वाढ

दिवाळीतील पाच दिवसांपैकी सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी साक्षात लक्ष्मी आपल्या घरी येते, अशी मान्यता आहे. त्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीची या दिवशी अत्यंत भक्तीभावाने पूजा केली जाते.

माता लक्ष्मीची कृपा ज्यांच्यावर होते त्यांना आयुष्यात सुख आणि आनंद मिळतो. संपत्ती आणि वैभव मिळतं. त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही. कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी पूजनावेळी काही मंत्रांचा जप केला तर माता लक्ष्मी प्रसन्न होते. चला तर ती मंत्र कोणती? जाणून घेऊया. (lakshmi pujan diwali lakshmi mata mantra read story )

हेही वाचा: Lakshmi Poojan Wishes: लक्ष्मीपूजनाला आपल्या माणसांना शेअर करा 'या' खास शुभेच्छा

१. 'ऊं ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा' 

या मंत्राचा जप केल्यास कर्जमुक्तीपासून सुटका मिळते आणि धनप्राप्ती होते. कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या लोकांनी लक्ष्मीपूजनावेळी या मंत्राचा जप करावा.

२. 'ऊं श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:' 

या मंत्राचा जप केल्याने यश मिळतं. हाती घेतलेल्या आर्थिक व्यव्हारात अडचणी येत नाही आणि पैसा येतो. त्यामुळे लक्ष्मी पूजन करताना या मंत्राचा जप करावा.

हेही वाचा: Lakshmi Pujan 2022 : लक्ष्मी मातेची मांडणी अन् पूजा कशी करावी? जाणून घ्या पूजेची विधी

 ३. 'पद्मानने पद्म पद्माक्ष्मी पद्म संभवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम्'

या मंत्राचा जप केल्याने घरात संपत्ती येते. पैशाची कमतरता राहत नाही. संपत्ती वाढत राहते. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या वेळी आवर्जून या मंत्राचा जप करावा. 

४. ' धनाय नमो नम:' आणि 'ऊं धनाय नम:' 

आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी या मंत्राचा लक्ष्मी पूजनावेळी जप अवश्य करावा. यामुळे तुमच्या वर लक्ष्मी माता प्रसन्न होणार आणि तुमच्या आर्थिक अडचणी दूर होणार.

टॅग्स :DiwaliLakshmi Pujan