

गजेंद्र मंडलिक
Hanuman’s favorite tree for worship rituals: रूई ही भारतात सर्वत्र आढळणारी एक बहुवर्षायू औषधी वनस्पती आहे. झुडूप स्वरूपाची ही वनस्पती प्रामुख्याने कोरड्या व उन्हाळी प्रदेशात आढळते. हिला ‘कॅलोट्रापिस प्रोसेरा’ असे शास्त्रीय नाव असून ती एस्क्लेपिएडीसी या कुळातील आहे. पवनपुत्र हनुमानजींना आवडणारी ही वनस्पती असून या झाडाच्या फुलांचे हार तसेच फुले हनुमानाच्या मूर्तीला अर्पण करण्याची प्रथा आहे.
या वनस्पतीच्या शास्त्रीय नावाचा अर्थही अतिशय सुंदर आहे कॅलोट्रापिस म्हणजे ‘सुंदर फुलांची मांडणी’ यातील कॅलोज म्हणजे सुंदर आणि ट्रॉपीस म्हणजे फुलातील मुकुटसदृश भाग. जो या वनस्पतीच्या फुलांत खूप आकर्षक असतो. प्रोसेरा म्हणजे ‘उंच वाढणारी’, त्यामुळे कॅलोट्रापिस प्रोसेरा या नावाचा अर्थ होतो ‘उंच वाढणारी, सुंदर कोरोनाधारी असलेली वनस्पती.’