

Mahakavi kalidas Din:The Meghdoot Mystery
esakal
Kalidas Day Special: "आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं..." या ओळी कानावर पडताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो विरहव्याकुळ यक्ष आणि त्याचा संदेश घेऊन अलकानगरीकडे निघणारा मेघ! आज आषाढ शुद्ध प्रतिपदा. संपूर्ण साहित्य जगतात आपल्या एका काव्यातील ओळीमुळे ज्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो, ते एकमेवाद्वितीय लेखक म्हणजे महाकवी कालिदास.
आजचा दिवस जगभरात 'महाकवी कालिदास दिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वाल्मिकींच्या नीतीला आणि व्यासांच्या बुद्धीला सौंदर्याची जोड देणाऱ्या या कविकुलगुरूंच्या साहित्याने शतकानुशतके मानवी मनावर अधिराज्य गाजवले आहे.