

Makar Sankranti 2026 Daan Rules
sakal
Ekadashi and Makar Sankranti Coincide in 2026: मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या सणांपैकी एक सण मानला जातो. यंदा हा सण आज म्हणजेच 14 जानेवारीला साजरा होणार असून या दिवशी षटतिला एकादशीचा योग देखील जुळून आला आहे. हा संक्रांती आणि एकादशी तिथीचा एकत्र योग अत्यंत दुर्मिळ मानला जातो. त्यामुळे या दिवशी केलेल्या दानाचे आणि पुण्याचे फळ दुप्पट मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.
पंचांगानुसार, या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याचे हे संक्रमण अत्यंत शुभ मानले जाते. एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित असल्याने मकर संक्रांतीचे आध्यात्मिक महत्त्व आज वाढले आहे. मात्र, यंदा एकादशी तिथीमुळे काही दानाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे, विशेषतः भात आणि खिचडीच्या दानाबाबत. हे संभ्रम दूर करुन आज कोणते दान योग्य असेल ते जाणून घेऊया.