मार्गशिर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. कारण, हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यात अनेक व्रतवैकल्ये केली जातात. आज मार्गशिर्ष महिन्यातील पहिला गुरूवार आहे. या महिन्यातील प्रत्येक गुरूवारी देवीच्या पूजेची मांडणी करून तिची कथा वाचली जाते.
मार्गशिर्षातील गुरूवारी सायंकाळी देवीची पूजा मांडली जाते. काही महिला ही पूजा सकाळीही करतात. पण सायंकाळच्या वेळी देवी लक्ष्मी घरी येते. त्यामुळे, सायंकाळच्या वेळी ही पूजा मांडणे शुभ असते. देवीची पूजा मांडून तिची कथा वाचली जाते.