Shravan 2022: भगवान महादेवाला प्रिय असलेल्या धोतरा वनस्पतीचे औषधी उपयोग... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Datura plant

Shravan 2022: भगवान महादेवाला प्रिय असलेल्या धोतरा वनस्पतीचे औषधी उपयोग...

श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या साम्रगीत मध्ये काही खास गोष्टींचा समावेश केला जातो. यामध्ये बेलपत्र, पांढरे फुल तसेच भगवान शंकराला धोतर्‍याचे फूल वाहतात. हे फुल महादेवाला खूप प्रिय असते. धोतरा हे विषारी फळ असते परंतु आपल्या हे माहिती आहे की, महादेवाने समुद्र मंथनातून निघालेले हलाहल विष प्राशन करून या सृष्टीचे रक्षण केले होते. भगवान महादेवाने विष प्राशन करून जगाला परोपकार, उदारता आणि सहनशीलतेचा संदेश दिला आहे. शिव पूजेमध्ये धोतर्‍याचे विषारी फळ, फुल अर्पण करण्यामागे हाच भाव आहे की कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात कटू व्यवहार आणि वाणीपासून दूर राहावे. स्वार्थाची भावना न ठेवता इतरांचे हित जोपासावे. यामुळेच स्वतःचे आणि इतरांचे जीवन सुखी होऊ शकते.

धोतरा वनस्पती विषयी सविस्तर माहिती..

धोत्र्यात तीन जाती आहेत. पांढरा, निळसर काळा आणि राजधोत्रा. पांढरा आणि काळा धोत्रा सर्वत्र असतो. त्यांचे पंचांग औषधात वापरतात. याशिवाय एक पिवळा धोत्रा नावाची रानटी जात रानोमाळ सर्वत्र आढळते. ती आफ्रिकेतून आली असावी, असे म्हणतात. त्याचा औषधी वा अन्य उपयोग अजिबात नाही. काळा, पांढरा आणि राजधोत्रा ही झाडे बहुतेक सारखी दिसतात, मात्र बाह्य़स्वरूपात थोडा फरक आहे. पांढरा आणि काळा धोत्रा सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर उगवतो. त्यांचे पंचांग औषधात वापरतात.

हेही वाचा: Shravan 2022: जिथे भगवान शिव तिथे रुद्राक्ष का असतो?

धोतरा वनस्पती औषधी उपाय:
● धोतऱ्याच्या फळातील अँटी इन्फ्लेमेट्री गुणामुळे सूज कमी होण्यास मदत होते. जेथे सूज आहे त्या जागी धोतऱ्याची पेस्ट करून लावावी.
● कोणत्याही प्रकारची वेदना या फळामुळे दूर होते. धोतरा वाटून त्याची पेस्ट बनवून त्यात चार थेंब मध मिसळावे. हे मिश्रण दुखणाऱ्या जागी लावावे. यात जंतुनाशक गुण असल्याने दुखणं दूर होतं.
● हाडं मजबूत करण्यासाठी धोतऱ्याचा उपयोग होतो. धोतऱ्यात कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असतं. याचा रस काढून सांध्यांवर मालीश केल्यास गुण पडतो. हाडं बळकट होतात.
● धोतऱ्याच्या फळाचा रस केसांसाठी उपयोगी असतो. या रसातील विशेष गुणांचा फायदा झाल्याने टक्कल पडण्याची समस्या बऱ्याच अंशी दूर होते.
● कानाचं दुखणं, सूज या समस्यांमध्ये धोतऱ्याच्या फळाचा उपयोग होतो. धोतऱ्याच्या फळात अँटी इन्फ्लेमेट्री आणि अँटीसेप्टिकचे गुण असतात.
● हे फळ जखमेवर गुणकारी आहे. पण ते त्वचेवर वापरायचं आहे. त्यातील विषारी तत्वांमुळे ते खायचं मात्र नाही. शिवाय लहान मुलांपासूनही ते दूर ठेवायचं असतं.


टीप - बिया मादक, ज्वरनाशक व कृमिनाशक आहेत. त्या चुकून खाल्ल्यास डोके दुखते व उलटी होते. धोतऱ्याची मात्रा अधिक प्रमाणात सेवन केल्यास मृत्यूही ओढावतो.

Web Title: Medicinal Uses Of Datura Plant Which Is A Favourite Of Lord Shankara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..