
Which zodiac signs are lucky on Mohini Ekadashi: आज मोहिनी एकादशी साजरी केली जात आहे. दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी काही शुभ दुर्मिळ योग तयार होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले आणि सर्व देवांना अमृत पाजले. मोहिनी एकादशीच्या दिवशी मीन राशीत हर्षण योग, बुधादित्य योग आणि त्रिग्रही योग तयार होत आहेत. यामुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळणार आहे. याशिवाय, भगवान विष्णूंची देखील या राशींना कृपादृष्टी असणार आहे. मोहिनी एकादशीच्या दिवशी होणाऱ्या शुभ योगाचा फायदा पुढील राशींना होणार आहे.