Mokshada Ekadashi 2024: मोक्षदा एकादशीला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा हे खास उपाय, येत्या वर्षातही राहील कृपादृष्टी

Mokshada Ekadashi 2024: मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. या दिवशी तुळशीची पूजा करणे धार्मिकदृष्ट्या महत्वाचे मानले जाते.
Mokshada Ekadashi 2024:
Mokshada Ekadashi 2024:Sakal
Updated on

Mokshada Ekadashi 2024: आज मोक्षदा एकादशीचे साजरी केली जात आहे. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केल्यास येत्या वर्षातही माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायम तुमच्यावर राहील. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात येणाऱ्या एकादशी तिथीला हिंदू धर्मात खास महत्त्व आहे.

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. या दिवशी तुळशीची पूजा करण्याचेही शास्त्रात विशेष महत्त्व मानले गेले आहे. तसेच मोक्षदा एकादशीला आपल्या पितरांच्या नावाने आपल्या आवडत्या वस्तू दान केल्याने मोक्षप्राप्ती होते. मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीही साजरी केली जाते.

या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला गीतेचा उपदेश केला. त्यामुळेच हा दिवस गीता जयंती म्हणूनही साजरा केला जातो. हा दिवस मोक्षप्राप्तीचा दिवसही मानला जातो. चला तर मग जाणून घेऊया मोक्षदा एकादशीला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावे आणि आज कोणत्या वस्तू दान करणे शुभ मानले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com