Mokshada Ekadashi 2025: मोक्षदा एकादशीला तुळशीसंबंधित करु नका 'या' चुका, अन्यथा आयुष्यात वाढेल समस्या

Sakal

Mokshada Ekadashi 2025: मोक्षदा एकादशीला तुळशीसंबंधित करु नका 'या' चुका, अन्यथा आयुष्यात वाढेल समस्या

Tulsi mistakes to avoid on Mokshada Ekadashi: मोक्षदा एकादशीला हिंदू धर्मात खुप महत्व आहे. ही एकादशी विष्णू भक्तांसाठी खास मानली जाते. पण या दिवशी तुळशीसंबधित कोणत्या गोष्टी करणे टाळावे हे जाणून घेऊया.
Published on

Mokshada Ekadashi 2025: हिंदू धर्मात मोक्षदा एकादशीला खास महत्व आहे. ही वर्षातील सर्वात पवित्र एकादशी मानली जाते. हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. असं मानलं जातं की या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते आणि मोक्ष मिळते.

मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भगवान विष्णूंना तुळशी खूप प्रिय आहे आणि घरात त्याचे रोप लावणे आणि पूजा केल्याने शांती, आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. या दिवशी तुळशीची पूजा करण्यात कोणतीही चूक करणे महागात पडू शकते. जर विधीत काही त्रुटी असतील किंवा नियमांचे पालन केले नाही तर पूजेचे फळ अपूर्ण राहतेच, परंतु भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद देखील मिळत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com