Money Plant : घरी मनी प्लांट लावत असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

money planting plant

Money Plant : घरी मनी प्लांट लावत असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर...

मनी प्लांट एक अशी वनस्पती आहे जी कोणत्याही ऋतूमध्ये कुठेही सहजपणे लावता येते. बहुतेक घरांमध्ये ही वनस्पती लावण्याची कारणे वेगवेगळी आहेत. काहीजण ही वनस्पती शो साठी लावतात, तर काही घराचं सौंदर्य वाढवण्यासाठी. दरम्यान, वास्तुशास्त्रात मनी प्लांटला खूप महत्त्व आहे. ज्या घरात मनी प्लांट वनस्पती लावला जातो, तिथे जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते, असे मानले जाते. अशा स्थितीत घरात सुख-समृद्धी कायम वास करुन राहते.

वास्तुशास्त्रानुसार, घरात मनी प्लांट लावल्यानंतर काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नाहीतक येथील मनी प्लांट दुर्दैवाचे कारण बनू शकतो. जाणून घ्या घरात मनी प्लांट लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

मनी प्लांट लावताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • योग्य दिशेने असणे

वास्तूनुसार, मनी प्लांट योग्य दिशेला असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे मनी प्लांट नेहमी आग्नेय दिशेला ठेवावा. कारण ही दिशा गणेशाची मानली जाते. अशा स्थितीत घरात सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य खेळू लागते.

  • या दिशेने निर्देशित करू नका

वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट कधीही ईशान्य दिशेला लावू नये. या दिशेला मनी प्लांट लावल्यास आर्थिक अडचणी येतात. आपल्यापैकी काहींनी ही वनस्पती अशी लावली असेल तर त्यांना याचा अनुभव आला असेल.

  • घरामध्ये ठेवा

मनी प्लांट ही वनस्पती नेहमी घरामध्ये ठेवा. जिथे बाहेरच्या माणसांना कोणीच पाहू शकत नाही. कारण त्यामुळे झाडांची वाढ थांबू शकते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

  • मनी प्लांटचा व्यवहार करू नका

वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट कधीही कोणाकडून देऊ किंवा घेऊ नये. मनी प्लांट दिल्याने शुक्र ग्रह क्रोधित होतो असे मानले जाते. शुक्र हे धन, संपत्ती, सौभाग्य, सुखाचे प्रतीक मानले जाते. या प्रकरणात, व्यक्तीला नुकसान सहन करावे लागेल.

Web Title: Money Planting Plant At Home Keep These Things In Mind Vastu Tips

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..