Mother's Day: जिच्यामुळे ‘मदर्स डे’ साजरा होतो, तिनेच का केला नंतर विरोध?

The Untold Story Behind Mother’s Day And Its Creator’s Regret: ‘मदर्स डे’ साजरा व्हावा म्हणून झटलेली अ‍ॅना जार्विसच पुढे त्याच्या व्यावसायिक रूपाविरोधात उभी राहिली.
Anna Jarvis- Lady Behind Mother's Day
Anna Jarvis- Lady Behind Mother's Daysakal
Updated on

The Woman Behind Mother's Day: जगभरात आईप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जातो. पण फार कमी लोकांना माहीत आहे की ज्यांनी या खास दिवसाची सुरुवात केली, त्यांनीच नंतर या दिवसाविरोधात मोहीम छेडली होती.

ही कहाणी आहे अ‍ॅना जार्विस हिची. अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनियामधील अ‍ॅना हिने आपल्या आई अ‍ॅन रीव्ज जार्विस यांच्या आठवणीत १९०८ मध्ये 'मदर्स डे' साजरा करण्याची कल्पना मांडली. अ‍ॅन रीव्ज यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिला आणि मातांच्या आरोग्यासाठी समर्पित केले होते. त्यांच्या सन्मानार्थ अ‍ॅना हिने ‘मदर्स डे’ साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला.

१९१४ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुडरो विल्सन यांनी अधिकृतपणे 'मदर्स डे' हा राष्ट्रीय दिवस म्हणून जाहीर केला. त्यानंतर या दिवसाने आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रियता मिळवली. मात्र, पुढील काही वर्षांत या दिवसाचा व्यापारीकरण होऊ लागला. ग्रीटिंग कार्ड्स, गिफ्ट्स, कमर्शियल जाहिरातींच्या माऱ्याने हा दिवस बाजारू बनत चालला.

हे पाहून अ‍ॅना खूपच दु:खी झाली. "ही भावना विकली जाऊ नये" असे म्हणत तिने स्वतःच मदर्स डेच्या विरोधात मोहीम राबवायला सुरुवात केली. तिने या दिवसाला रद्द करण्यासाठी कोर्टातही धाव घेतली. तिच्या आयुष्यातील शेवटची काही वर्षं तिने मदर्स डेच्या व्यापारीकरणाविरोधात लढा देण्यात घालवली.

अखेरच्या काळात अ‍ॅना एकाकी जीवन जगली.तिला तिच्या प्रयत्नांमागचं यश मिळालं नाही, पण तिने दाखवलेला संघर्ष आजही लोकांना आठवण करून देतो की खऱ्या भावना जाहिरातींच्या गदारोळात हरवू नयेत.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com