Nag Panchami 2023 : नागपंचमीच्या दिवशी महादेवाला या गोष्टी अर्पण करा, मिळेल दुप्पट लाभ

आज चंद्र त्याच्या मूळ राशीत असणार आहे. त्यामुळे गजकेसरी योग जुळून येतोय
Nag Panchami 2023
Nag Panchami 2023 esakal

Nag Panchami 2023 : आज श्रावणातला पहिलाच सोमवार याच दिवशी नागपंचमीचा देखील शुभ योग जुळून आला आहे. या दिवशी भगवान शंकराची विधीवत पूजा केल्याने तुम्हाला दुप्पट लाभ होईल. ज्योतिषशास्त्रानुसार आज श्रावणी सोमवारला विशेष योग जुळून आलाय. श्रावण महिना हा अधिक पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. आज चंद्र त्याच्या मूळ राशीत असणार आहे. त्यामुळे गजकेसरी योग जुळून येतोय.

आज पहाटे ४.२२ मिनिटांनी सर्वार्थ सिद्धी योग होता, तर अमृत योगही तयार होत आहे. या सर्व शुभयोगांसह रवि योगही राहणार आहे. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करणेही उत्तम आहे. तसेच या दिवशी भगवान शंकराचा रुद्राभिषेक करणे देखील खूप फायदेशीर आहे. (Culture)

Nag Panchami 2023
Shravan 2023 : व्रतवैकल्यांचा श्रावणमास आजपासून; सण- उत्सवांची रेलचेल

पंचमी तिथीचा शुभ काळ अन् महत्व

श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी २१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १२.२३ ते २२ ऑगस्ट २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत राहील. मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने जीवनातील समस्या सुटतात. तसेच व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. (Nag Panchami)

Nag Panchami 2023
Nagpanchami 2022 : चांदोरीला निघाली पारपरिक गवळी मिरवणूक

नागपंचमीच्या दिवशी महादेवाला या गोष्टी अर्पण करा

कालसर्प दोष टाळण्यासाठी या दिवशी भगवान शंकराला कच्चे दूध, काळे तीळ, तांदूळ आणि गंगाजल अर्पण करा. या उपायाने तुमचा कालसर्प दोष आणि पितृदोषाचा त्रास कमी होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com