

Narak Chaturdashi Rituals
sakal
Diwali Tradition: दिवाळीच्या सणात अभ्यंगस्नानाला विशेष महत्त्व आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सुगंधी तेल आणि उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आजही पाळली जाते. या स्नानापूर्वी किंवा स्नान झाल्यावर घरातील व्यक्तींना कणकेच्या दिव्याने ओवाळण्याची प्रथाही काही ठिकाणी पाहायला मिळते. या विधीमागे केवळ धार्मिक श्रद्धाच नाही, तर आपल्या प्रिय व्यक्तीच्या आरोग्याची आणि सुखी आयुष्याची कामना करण्याची भावनाही जोडलेली आहे. या परंपरेमागील काही महत्त्वाच्या धारणा जाणून घेऊया.