
Importance of Narali Pournima: श्रावण महिन्यातील प्रमुख सणांपैकी एक म्हणजे रक्षाबंधन, आणि त्याच दिवशी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. महाराष्ट्रात, विशेषतः कोकणातील कोळी समाज हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदात साजरा करतो. या दिवशी समुद्राची पूजा केली जाते आणि नारळ अर्पण केले जाते. हे समुद्राशी असलेले नाते जपण्याचे आणि सुरक्षिततेसाठी वरदान मागण्याचे प्रतीक मानले जाते. रक्षाबंधनासोबत साजरी होणारी नारळी पौर्णिमा ही श्रावणातील एक महत्त्वाची परंपरा आहे, ज्यामध्ये श्रद्धा आणि सामूहिक उत्साहाचा उत्सव असतो.
श्रावणातील पौर्णिमेला महाराष्ट्र, गोवा, आणि कर्नाटकातील अनेक लोक खासकरून कोळी समाज नारळी पौर्णिमा साजरी करतात. 'नारळी' म्हणजे नारळ आणि 'पौर्णिमा' म्हणजे पूर्ण चंद्रमेची रात्र. या दिवशी सगळे कोळी बांधव समुद्रकिनाऱ्यावरील आपल्या बोटी सजवतात, उपवास करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करून वरुण देवतेची पूज करतात. या मार्फत ते आपल्या सुरक्षिततेसाठी आणि वर्षभर त्यांचा मासेमारीवर चालणारा उदरनिर्वाह कायम टिकून राहण्यासाठी आशीर्वाद मागतात.
यावर्षी नारळी पौर्णिमा ८ ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. पूजेचा शुभ मुहूर्त ८ ऑगस्ट रोजी दुपारी २.१२ मिनिटांनी सुरु होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी दुपारी १.२४ मिनिटांनी संपणार आहे.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव जे प्रामुख्याने मासेमारीचा व्यवसाय करतात, ते लोक समुद्राला नारळ अर्पण करून पूजा करतात. असे मानले जाते की, श्रावणी पौर्णिमेला पूजा केल्याने समुद्र प्रसन्न होतो. पावसाळ्यात आणि इतर महिन्यातही येणाऱ्या समुद्राच्या सगळ्या संकटांपासून मासेमाऱ्यांचे रक्षण व्हावे यासाठी कोळी लोक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण निराळी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.
किनारी प्रदेशात राहणाऱ्या समुदायामध्ये साजऱ्या होणाऱ्या या पौर्णिमेच्या दिवशी शंकराची देखील पूजा केली जाते. कारण नारळाला असणारे तीन डोळे हे शंकराचे प्रतीक असून श्रावण महिना हा शंकराचा आवडता आणि पवित्र महिना आहे. त्यामुळे शंकराला नारळ आणि त्याच्या आवडीच्या वस्तू अर्पण केल्या जातात.
नारळी पौर्णिमेच्या आधी सगळे कोळी बांधव मोठया लगबगीने तयारी सुरु करतात. मासेमारीसाठी वापरली जाणारी जुनी जाळी दुरुस्त करतात, बोटींना रंग देण्यात येतो, तर काहीजण नवीन बोटी सुद्धा विकत घेतात. समुद्र आणि बोटींवरच पूर्ण उदरनिर्वाह असल्याने, कोळी बांधव या गोष्टींना पवित्र मानतात आणि त्यांची मनोभावे पूजा करतात.
या दिवशी नारळीभात किंवा नारळाचे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. पूजेनंतर कोळी बांधव आपल्या सजवलेल्या बोटीतून समुद्राचा थोडा प्रवास करतात आणि बाकीचा दिवस गाणी गात, पारंपारिक कोळी नृत्य करत आणि आनंदाने घालवतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.